शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

भोजाजी देवस्थानला केंद्रीय तीर्थक्षेत्र विकास योजनेत स्थान द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2019 9:59 PM

तालुक्यातील आजनसरा येथील भोजाजी महाराज देवस्थानचा केंद्रीय तीर्थक्षेत्र पर्यटन विकास आराखड्यात समावेश करावा, अशी मागणी मंदीर विश्वस्त मंडळाच्यावतीने केंद्रीय जलसंधारण, भूपृष्ठ वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

ठळक मुद्देविश्वस्त मंडळाचे नितीन गडकरी यांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : तालुक्यातील आजनसरा येथील भोजाजी महाराज देवस्थानचा केंद्रीय तीर्थक्षेत्र पर्यटन विकास आराखड्यात समावेश करावा, अशी मागणी मंदीर विश्वस्त मंडळाच्यावतीने केंद्रीय जलसंधारण, भूपृष्ठ वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.आ. डॉ. रामदास आंबटकर यांनी नागपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात आजनसरा येथील भोजाजी महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. विजय पर्बत यांची ना. नितीन गडकरी यांच्याशी भेट घालून दिली. यावेळी सदर मागणीचे निवेदन ना. गडकरी यांना सादर करण्यात आले आहे. संपूर्ण विदर्भासह राज्यातील अनेक भाविकांचे आजनसरा येथील भोजाजी महाराज देवस्थान श्रद्धास्थान आहे. येथे हजारो क्विंटल पुरणाचा प्रसाद नागरिकांना नैवद म्हणून दिला जातो. महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागातील सुमारे ५० हजारांच्यावर भाविक येथे भेट देतात. या परिसरात नागरी सुविधांसोबतच पर्यटकांच्या दृष्टीने इतर सोयी निर्माण करण्यासाठी या देवस्थानचा केंद्रीय पर्यटन विकास आराखड्यात समावेश करावा, अशी विनंती या निवेदनातून करण्यात आली आहे. या देवस्थानच्या विकासासाठी खा. रामदास तडस, आ. समीर कुणावार, आ. डॉ. रामदास आंबटकर यांनी प्रयत्न सुरू केले असून ना. गडकरी यांनी वडनेर राष्ट्रीय महामार्गापासून ते आजनसरा देवस्थानापर्यंत द्विपदरी सिमेंट रोडच्या कामाला मंजूरी दिली असल्याचे कळविण्यात आले आहे.