समीर कुणावार यांचे प्रतिपादन : भाजयुमोच्या जनसंवाद यात्रेचा समारोपलोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : पंडित दिनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्त पक्षाच्यावतीने पक्षविस्तार योजनेंतर्गत शिवार संवाद अभियान राबविले जात आहे. या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत प्रामाणिकपणे पोहोचविण्याचा माझा प्रयत्न आहे, असे मत आ. सुमीर कुणावार यांनी व्यक्त केले.भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने ९ ते ११ जून दरम्यान हिंगणघाट विधानसभा मतदार संघात भाजपा सरचिटणीस किशोर दिघे यांच्या मार्गदर्शनात तीन दिवसीय जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. येथील पक्ष कार्यालयात संवाद यात्रेचा समारोप कण्यात आला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर माजी खासदार सुरेश वाघमारे, भाजपा सरचिटणीस किशोर दिघे, अविनाश देव, नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, भाजयुमो जिल्हाध्यक्ष अंकुश ठाकूर, बिसमील्ला खान, शहराध्यक्ष सुभाष कुंटेवार, समुदपूर पं.स. सभापती कांचन मडकाम, योगेश फुसे, आकाश पोहाणे, संजय डेहणे, कुलधरीया आदी उपस्थित होते.आ. कुणावार पुढे म्हणाले की, शेतकरी आंदोलनाची दखल घेणारे ना. फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री आहे. शेतकरी कर्जमाफी ऐतिहासिक निर्णय आहे. काँग्रेसने ५० वर्षांत जे केले नाही, ते युती शासनाने अडीच वर्षांत करून दाखविले. वाघमारे यांनी शेतकऱ्यांच्या माध्यमातून ‘सबका साथ, सबका विकास’ हेच शासनाचे ध्येय आहे. भाजपा जनतेसाठी राजकारण करीत आहे, असे सांगितले. दिघे यांनी तीन दिवसीय संवाद यात्रेची सविस्तर माहिती दिली. विविध गावांत शेतकऱ्यांशी संवाद साधून समाधान करण्यात आले. शासनाबाबत विरोधकांनी गैरसमज निर्माण केले; पण शासनावर शेतकऱ्यांचा पूर्ण विश्वास आहे, असे संवाद यात्रेतून दिसून आल्याचे सांगण्यात आले. प्रास्ताविक अंकुश ठाकूर, संचालन अरुण गोटेकार यांनी केले तर आभार कुंटेवार यांनी मानले. संवाद यात्रेत सोनू गवळी, दिनेश वर्मा, स्वप्नील येंडे, सौरभ पांडे, राहुल सोरटे, निलेश पोणले, अंकुश खुरपडे, विइू बेनीवार, कविश्वर इंगोले, कवी भट, सुनील जवादे व पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.
योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न
By admin | Published: June 13, 2017 1:08 AM