शहरं
Join us  
Trending Stories
1
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
2
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
3
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
4
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
5
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
6
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
8
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
9
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
10
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योग गुरूंनीच सांगितलं...
11
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
12
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
13
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
14
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
15
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
16
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
17
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
19
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
20
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा

वर्ध्यातील कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये कोविड रूग्णांसाठी प्लाज्मा संग्रहण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 3:19 PM

सेवाग्राम येथील कस्तुरबा हॉस्पिटलची ब्लड बँक आणि महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या संस्थेने गुरुवार २० ऑगस्टपासून कोविड प्लाज्मा संकलन सुरू केले आहे.

ठळक मुद्देनागपूर विभागात नागपूर नंतरचा वर्धा दुसरा जिल्हा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: सेवाग्राम येथील कस्तुरबा हॉस्पिटलची ब्लड बँक आणि महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या संस्थेने गुरुवार २० ऑगस्टपासून कोविड प्लाज्मा संकलन सुरू केले आहे. कोविड -१९ संसर्गातून मुक्त झालेल्या व्यक्तींमध्ये रक्तात अँटीबॉडी तयार होत असतात, ज्या कोरोना विषाणूंविरूद्ध लढायला मदत करतात. कोरोना विषाणू संसर्गग्रस्त रूग्णांमध्ये बरे झालेल्या रुग्णाच्या रक्तातील प्लाज्मामुळे त्यांची रोग प्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते आणि रुग्ण कोरोनातून लवकर बरा होतो. या सुविधेमुळे कोरोना संसर्गित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढणार असून अशी सुविधा उपलब्ध असलेला वर्धा हा विभागातील दुसरा जिल्हा आहे.कोरोनातून बरे झालेले उपजिल्हाधिकारी मनोज खैरनार हे प्रथम प्लाज्मा दाता होते. तसेच कोविड संसगार्पासून बरे झालेले सुधांशु डूकरे, यांनीही प्लाज्मा दान केले.जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांच्या उपस्थितीत प्लाज्मा दान करण्यास सुरुवात झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले उपस्थितीत होते. कस्तुरबा हेल्थ सोसायटीचे विश्वस्त पी.एल. तापडिया, कस्तूरबा हेल्थ सोसायटी, सेग्रामचे सचिव डॉ. बी.एस. गर्ग, एम.जी.आय.एम.एस सेवाग्रामचे डीन डॉ. नितीन गंगणे, पॅथॉलॉजी विभागातील प्राध्यापक व प्रमुख डॉ. अनुपमा गुप्ता, ब्लड बँकेचे प्राध्यापक व प्रभारी व्ही.बी. शिवकुमार उपस्थित होते.रुग्णालयातून सुटी झाल्यावर 28 दिवसांच्या कालावधी नंतर कोविड आजारातून बरे झालेल्या व्यक्ती प्लाज्मा दान करण्यास पात्र आहेत. प्लाज्मा दान करण्यासाठी सुमारे 45-60 मिनिटे लागतात. कोरोनातून बऱ्या झालेल्या व्यक्तीनी प्लाज्मा दान करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. एमजीआयएमएस सेवाग्राम व कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये कोविड संसर्गाचे निदान व उपचारासाठी सर्व आवश्यक सुविधेसोबतच आता प्लाज्मा उपचारही उपलब्ध आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या