लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नियोजित फलाट रिकामा असताना चालकाने एसटी बस भलत्याच ठिकाणी उभी केल्याने प्रवाशांची एकच धावपळ झाली. शनिवारी वर्धा बसस्थानकावर हा प्रकार घडला. यामुळे प्रवाशांना मात्र मनस्ताप सहन करावा लागला.‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद अंगीकारलेले परिवहन महामंडळ सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी भंगार बसेस तर कधी चालक-वाहकाचा मनमर्जी कारभार, बसफेऱ्या रद्द करणे. परिवहनच्या वाहकाकडून प्रवाशांना कधीच सौजन्याची वागणूक दिली जात नाही. अनेक ठिकाणी बसचा थांबा असताना चालक वाहकाकडून मनमर्जीने बसला थांबा दिला जात नाही. यामुळे प्रवाशांना दुसºया बसच्या प्रतीक्षेत तासन्तास ताटकळत राहावे लागते.याविषयी नियंत्रकांकडे तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही. बसफेºया रद्द होणे, वेळेवर न येणे यामुळे विद्यार्थ्यांना दररोज प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून येते.वर्धा बसस्थानकाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. ज्या मार्गावरील बसगाड्या जेथे लागतात, तेथे फलकही लावण्यात आले आहे. असे असताना शनिवारी वाहकाकडून बसस्थानकातील यवतमाळचा फलाट रिकामा असताना चालकाने या फलाटावर बस उभी न करता दुसºया मार्गाने जाणाºया गावाच्या फलाटावर उभी केली. यवतमाळकडे जाणारे प्रवासी यवतमाळच्या फलाटावर उभे होते, तर बस नागपूरकडे जाणाºया फलाटावर थांबली. यामुळे अनेक प्रवाशांची धावपळ झाली. यात वयोवृद्ध प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. ग्रामीण प्रवाशांच्या दिमतीला भंगार बसेसच आहेत. असे असले तरी परिवहनची लालपरी अर्थात एसटी बसचा शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा आधार आहे. महामंडळ कुठल्याही सुविधा पुरवत नसले तरी ग्रामीणांचा विश्वास आहे. मात्र, चालक-वाहकांकडून या विश्वासाला वेळोवेळी तडा दिला जातो. शनिवारी घडलेल्या प्रकारामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. मनमर्जीने वागणाºया वाहक-चालकावर कारवाई करण्याची मागणी यावेळी प्रवासीवर्गातून होत आहे.ब्रिदाला हरताळचालक-वाहकांच्या उद्धट कृतीमुळे परिवहन महामंडळाच्या ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ या ब्रिदाला नेहमीच हरताळ फासला जातो. कॉलन बॉक्सनंतर प्रवाशांना करमणुकीकरिता बसगाड्यांमध्ये मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. अल्पावधीतच या व्यवस्थेचे वाभाडे निघाले. अनेक बसगाडयांमधून वायफाय बॉक्स बेपत्ता झाले आहेत. याकडे लक्ष देण्याची गरज प्रवाशांतून व्यक्त होत आहे.
फलाट रिकामा, तरी लालपरी होई दुसरीकडे उभी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 10:13 PM
नियोजित फलाट रिकामा असताना चालकाने एसटी बस भलत्याच ठिकाणी उभी केल्याने प्रवाशांची एकच धावपळ झाली. शनिवारी वर्धा बसस्थानकावर हा प्रकार घडला. यामुळे प्रवाशांना मात्र मनस्ताप सहन करावा लागला.
ठळक मुद्देवर्धा बसस्थानकावर चालकाचा प्रताप। प्रवाशांचे भागंभाग