लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : तालुक्यात अंदोरी येथे शिळे अन्न खाण्यात आल्याने २२ जणांना विषबाधा झाली आहे. यात एकाच परिवारातील ११ जणांचा समावेश आहे. सर्वांना एकाचवेळी थंडी वाजून ताप आल्यानंतर उटली व हगवणीचा त्रास सुरु झाल्याने गावात धावपळ माजली. सर्वांना उपचाराकरिता सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.यातील तिघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरुअसल्याचे सांगण्यात आले आहे.अंदोरीच्या इंदिरा वसाहतीतील देवराव पोहणकर यांच्याकडे महालक्ष्मी पुजनानिमित्त रविवारला जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. या कार्यक्रमातील शिल्लक राहिलेल्या अन्नाचा दुसऱ्या दिवशी सोमवारी पोहणकर परिवारासह इतरांनीही आस्वाद घेतला. ज्यांनी हे शिळे अन्न खाल्ले त्या सर्वांनाच मंगळवारच्या पहाटे थंडी वाजुन ताप आला. तसेच उलट्या व हगवणीचाही त्रास सुरु झाला.पोहणकर कुटुंबियांतील एका पाठोपाठ अकरा जणांमध्ये ही लक्षणे दिसून येऊ लागली. तसेच इतर परिवारातील सदस्यांनाही हा त्रास सुरु झाल्याने प्रारंभी खासगी डॉक्टरला बोलावून उपचार करण्यात आले. त्यानंतरही आराम होत नसल्याने सर्वांना आरोग्य उपकेंद्रात दाखल करुन सलाईन लावण्यात आली. पण, परिस्थिती आटोक्यात येत नसल्याने सर्वांना बुधवारच्या मध्यरात्री सेवाग्रामच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी तिघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु केले. सध्या सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे.बाधितांमध्ये यांचा समावेशविषबाधा झालेल्या रुग्णांमध्ये पोहणकर परिवारातील देवराव पोहणकर, हनुमंत पोहणकर, साक्षी पोहणकर, मोनाली पोहणकर, आदित्य पोहणकर, सचिन पोहणकर, कल्पना पोहणकर, दीपा पोहणकर, छबु पोहणकर, देविदास पोहणकर, कौसल्य पोहणकर तसेच गायत्री निरघुडे, अर्चना खोकले, ऋषिकेश खोकले, नंदा भोयर, गुलाब ढगे, कुसुम ढगे, रुबीना आगवान, साहीन आगवान, वर्षा चौधरी, हनुमंत चौधरी, कविता चौधरी यांचा समावेश आहे.वैद्यकीय अधिकाऱ्यांची मुख्यालयाला दांडी; सुविधांचा अभावअंदोरी येथील आरोग्य उपकेंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. श्वेता थूल व दोन परिचारीका कार्यरत आहे. परंतु वैद्यकीय अधिकारी थूल व एक परिचारीका वर्धेवरुन ये-जा करतात. त्यामुळे रात्रीच्यावेळी त्यांची उपकेंद्रात हजेरी राहत नाही. एका शिकाऊ परिचारीकेच्या भरवश्यावरच रात्री उपकेंद्राचे कामकाज चालते.परिणामी रात्रीच्यावेळी आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्यास रुग्णांना सेवाग्राम किंवा सावंगी रुग्णालयात धाव घ्यावी लागते.त्यामुळे वरिष्ठांनी लक्ष देत कार्यवाही करण्याची मागणी गावकºयांकडून करण्यात आली आहे.आरोग्य विभागाची उडाली धावपळअंदोरीत गावात विषबाधा झाल्याची माहिती मिळताच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण धमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय चमू गावात दाखल झाली. एकाच वेळी २२ जणांना विषबाधा झाल्याने आरोग्य विभागाची धावपळ उडाली. त्यांनी अन्नाचे व पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविले. तसेच रुग्णांवर उपचारही सुरु केले असून इतरही रुग्णांचा शोध सुरु आहे.
अंदोरीत २२ जणांना विषबाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 9:02 PM
तालुक्यात अंदोरी येथे शिळे अन्न खाण्यात आल्याने २२ जणांना विषबाधा झाली आहे. यात एकाच परिवारातील ११ जणांचा समावेश आहे. सर्वांना एकाचवेळी थंडी वाजून ताप आल्यानंतर उटली व हगवणीचा त्रास सुरु झाल्याने गावात धावपळ माजली.
ठळक मुद्देशिळे अन्न खाल्ल्याने उलटी व हगवण : एकाच कुटुंबातील ११ जणांचा समावेश