शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

वर्धा जिल्ह्यात विनापरवाना पिस्तूल बाळगणारा पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 4:37 PM

विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्या एका इसमास बुधवारी दुपारच्या सुमारास वडनेर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी एक पिस्तूल व दहा राऊंड तसेच दारूची बाटली असा मुद्देमाल जप्त केला आहे.

ठळक मुद्देदहा गोळ्याही जप्त अदिलाबाद ते नागपूर करीत होता बसने प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्या एका इसमास बुधवारी दुपारच्या सुमारास वडनेर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी एक पिस्तूल व दहा राऊंड तसेच दारूची बाटली असा मुद्देमाल जप्त केला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर-हैद्राबाद मार्गावर असलेल्या स्थिर निगरानी पथकाद्वारे नागरिकांच्या साहित्याची तपासणी करण्यात येत असून याच ठिकाणी अदिलाबाद ते नागपूर असा बसने प्रवास करीत असलेल्या सदर व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. शेख हैदर शेख ईब्राहीम (३५) रा. अदिलाबाद, असे ताब्यात घेतलेल्या संशयीताचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.प्राप्त माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग सातवर निगरानी पथकाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून वाहन तपासणी मोहीम राबविली जात होती. याच दरम्यान ए.पी. ०१ झेड. ००४५ क्रमांकाची बस अडवून त्यातील प्रवाशांच्या साहित्याची तपासणी सुरू असताना बसच्या मागील आसनाखाली एक पिस्तूल अधिकाऱ्यांना दिसून आली. त्यानंतर बारकाईने पाहणी केली असता बसच्या बाहेर दहा जिवंत काडतूस आढळून आले. त्यानंतर सदर घटनेची तातडीने वडनेर पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच वडनेरचे ठाणेदार आशीष गजभिये यांची त्यांच्या सहकार्यांसह घटनास्थळ गाठले. त्यानंतर बस आणि बस मधील प्रवाशांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. शिवाय ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. प्राथमिक चौकशी दरम्यान साहित्य तपासणीसाठी बस थांबताच बसमधील मागील आसनावरील एक इसम पटकन पुढील आसनावर आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर शेख हैदर शेख ईब्राहीम याला पोलिसांनी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता सदर पिस्तूल व जिवंत कारतूर त्याच्याच जवळ होते आणि तपासणीत आपण पकडले जाऊ नये म्हणून त्याची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने हे साहित्य फेकण्यात आल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे. शेख हैदर शेख ईब्राहीम याच्यावर वडनेर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी भिमराव टेळे यांच्या उपस्थितीत अरुण गुगळे, सुरज मेश्राम, शुभम वानखेडे, वडनेरचे ठाणेदार आशीष गजभिये, यादव यांनी केली. पुढील तपास सुरू आहे.शस्त्र बाळगण्याच्या उद्देशाचा घेतल्या जातोय शोधपोनकल, जिल्हा निर्मल, आंध्रप्रदेश येथील रहिवासी असलेल्या शेख हैदर शेख ईब्राहीम हा कुठल्या कारणाने शस्त्र बाळगत होता. इतकेच नव्हे तर त्याचा घातपाताचा इरादा तर नव्हता ना आदीचे उत्तर सध्या पोलीस शोधत आहेत.पिस्तूल बाळगणाऱ्यांला आम्ही ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून दहा कारतूस, एक पिस्तूल, दारूची शिशी आदी साहित्य ताब्यात घेण्यात आले आहे. तपास सुरू आहे.- आशीष गजभिये, ठाणेदार, वडनेर.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी