लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : रेल्वे स्टेशन परिसरातील रेल्वे वसाहतीत राहणाऱ्या भारती धीरज जांभूळकर (३८) या ब्युटीशियनची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेला जवळपास ६० तास लोटूनही पोलीस आरोपीपर्यंत पोहचू शकले नाही. पोलिसांनी अनेकांचे बयाण नोंदविले पण, अद्यापही पोलिसांचे हात रितेच आहे.हत्याकांडानंतर पोलिसांनी अनेकांना पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी केली. तसेच अखेरचा प्रयत्न म्हणून पोलिसांनी मृतक भारतीची आई कलावती निकोसे व भाऊ विशाल निकोसे दोघेही रा.माळगांव ता.सावनेर जि.नागपूर यांनाही ठाण्यात बोलावून त्यांचे बयाण नोंदविले. मृतक भारतीचे तिचे पती व परिवारांशी अत्यंत चांगले संबंध होते. भारतीकडून आपल्या पारिवारीक संबंधाबाबत कुठलीही तक्रार कधीच केली नाही, असे बयाणात सांगितल्याने पोलिसांना यातूनही धागा गवसला नसल्याचे ठाणेदार मुरलीधर बुराडे यांनी सांगितले. या हत्याकांडातील आरोपी शोधने पोलिसांसाठी आव्हान ठरत असून पोलिसांची चार चमू आरोपीचा शोध घेत आहे. परंतू अद्यापही आरोपी हाती लागला नसल्याने भारती जांभुळकर हत्याकांडाचा गुंता कायम आहे.
६० तास लोटूनही आरोपीपासून पोलीस दूरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 9:09 PM
रेल्वे स्टेशन परिसरातील रेल्वे वसाहतीत राहणाऱ्या भारती धीरज जांभूळकर (३८) या ब्युटीशियनची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेला जवळपास ६० तास लोटूनही पोलीस आरोपीपर्यंत पोहचू शकले नाही.
ठळक मुद्देभारती जांभूळकर हत्याकांड