आॅनलाईन लोकमतवर्धा : कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावा यासाठी २४ तास दक्ष राहून आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाºयांची स्थानिक सिव्हील लाईन भागातील निवासस्थानांची दैनावस्था झाली आहे. या पोलीस वसाहतीत अनेक प्राथमिक सोयी-सुविधांचा अभाव असून त्याचा तेथील रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सिव्हील लाईन भागातील ज्या परिसरात सध्या पोलीस कर्मचारी राहत आहेत ती वसाहत दुर्लक्षीत कारभारामुळे कोंडवाडाच बनला आहे, हे उल्लेखनिय.सिव्हील लाईन भागातील जिल्हा मध्यवर्ती कारागृहासमोर असलेल्या पोलीस वसाहतीत अनेक प्राथमिक सुविधांचा अभाव आहे. या परिसरात अनेक ठिकाणी पक्के रस्ते नाही. शिवाय पक्क्या नाल्याही नाहीत. मोठाले दगड तुडवतच पोलीस कर्मचाºयांना व त्यांच्या कुटुंबियांना येथून ये-जा करावी लागत आहे. अनेक ठिकाणच्या नाल्या खचल्याने तसेच काही ठिकाणीच्या नाल्या कचºयामुळे बुजल्याने ठिकठिकाणी सांडपाणी गोळा होत आहे. सदर सांडपाण्याच्या डबक्यात डासांची निर्मिती होत असून रहिवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. या प्रकारामुळे तेथील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.शिवाय या वसाहतीतील प्रत्येक घर इंग्रजकालीन निर्मित असून सध्या ते जीर्ण झाल्याने व त्याच्या देखभाल दुरूस्तीकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत असल्याने हा प्रकार एखाद्या अनुचित घटनेला आमंत्रण देणारा ठरत आहे. अनेक घरात साधे इलेक्टीकचे बोर्डही नाहीत. तर बहूतांश घरावरील टिनपत्रे तुटली असल्याने पावसाळ्याच्या दिवसात छतातून पावसाचे पाणी थेट घरात शिरते. शिवाय या वसाहतीतील एकाही घरी अर्थिंग नसल्याचे सांगण्यात येते. प्रात:विधीकरिता पोलिसी वसाहत परिसरात सार्वजनिक शौचालय आहेत. परंतु, अनेक शौचालयांना झुडपांचा विळखा असल्याने आणि झुडपांमध्ये सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर असल्याने घरातून शौचालयापर्यंतचा प्रवास धोक्याचा ठरत आहे. पावसाळ्याच्या दिवसात सर्वाधिक त्रास रहिवाशांना सहन करावा लागतो. या पोलिसी वसाहतीत सुमारे ३०० पोलीस कर्मचारी राहतात. त्यांची समस्या लक्षात घेता देखभाल दुरूस्तीची जबाबदारी असलेल्या वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देत तात्काळ कार्यवाही करण्याची गरज आहे.निवासस्थान ते शौचालयापर्यंतचा रात्रीचा प्रवास धोक्याचाजिल्हा मध्यवती कारागृहासमोरील पोलीस वसाहतीत सुमारे १५ घरातील रहिवाशांसाठी सार्वजनिक पद्धतीची शौचालये तयार करण्यात आली आहे;पण शौचालयांना झुडपांचा विळखा असून त्यात सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर असल्याने रात्रीचा निवासस्थान ते शौचालय हा प्रवास धोक्याचा ठरत आहे.आज याच संबंधाने नागपुरात बैठक पार पडली. ज्या ठिकाणी ही पोलीस वसाहत आहे. तेथे जुनी घरे तोडून ५०० पोलीस कर्मचाऱ्यांसाठी नवीन घरे तयार होणार आहे. शिवाय सेवाग्राम परिसरात ५० घरे तयार होणार आहे.- निर्मलादेवी एस., पोलीस अधीक्षक, वर्धा.
पोलिसांचे वास्तव्य कोंडवाड्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 11:21 PM
कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावा यासाठी २४ तास दक्ष राहून आपले कर्तव्य बजावणाºया पोलीस कर्मचाºयांची स्थानिक सिव्हील लाईन भागातील निवासस्थानांची दैनावस्था झाली आहे.
ठळक मुद्देप्राथमिक सुविधांचा अभाव : वरिष्ठांनी लक्ष देत कार्यवाही करण्याची गरज