आॅनलाईन लोकमतवर्धा : कुठेही अपघात झाल्यास सर्वप्रथम अपघातग्रस्तांना लोकांनी मदत करावी. त्वरित रुग्णालयात घेऊन जावे. या माणुसकीपूर्ण कामात पोलीस प्रशासनाकडून कोणताही त्रास होणार नाही, अशी ग्वाही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार यांनी दिली. वाहतुकीचे नियम तथा रस्त्यांवरील अपघातांची कारणे आणि वाहनचालकांनी घ्यावयाची काळजी यावरही त्यांनी मार्गदर्शन केले.दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था, वाहतूक नियंत्रण विभाग, न्यूरो केअर फाऊंडेशन व वर्धा सोशल फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) येथे हेल्मेट वाटप करण्यात आले. यात अपघातात डोक्याला होणाऱ्या दुखापतीबाबत जागृती अभियानास सुरूवात करण्यात आली. अभियानाचे उद्घाटन आरटीओ जिचकार यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप श्रीवास्तव तर अतिथी म्हणून वाहतूक नियंत्रण विभाग प्रमुख दत्तात्रय गुरव, रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी अभ्युदय मेघे, मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रशेखर महाकाळकर, न्यूरो सर्जन डॉ. संदीप इरटवार, सनदी लेखापाल गणेश खारोडे उपस्थित होते.अपघातात डोक्याला दुखापत झाल्यानंतर वैद्यकीय प्रयत्नांनी जीवनदान मिळालेल्या व्यक्तींना या कार्यक्रमात हेल्मेट देण्यात आले. याप्रसंगी डॉ. इरटवार यांनी डोक्याला होणारी इजा याबाबत चित्रफितीद्वारे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभ्युदय मेघे यांनी तर संचालन रुग्ण संपर्क अधिकारी एन.पी. शिंगणे यांनी केले.
माणुसकीपूर्ण कामात पोलिसांचा त्रास होणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 9:59 PM
कुठेही अपघात झाल्यास सर्वप्रथम अपघातग्रस्तांना लोकांनी मदत करावी. त्वरित रुग्णालयात घेऊन जावे. या माणुसकीपूर्ण कामात पोलीस प्रशासनाकडून कोणताही त्रास होणार नाही, अशी ग्वाही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार यांनी दिली.
ठळक मुद्देविनोद जिचकार : सावंगी (मेघे) रुग्णालयात हेल्मेट वाटप