ईदनिमित्त पोलिसांकडून चाचपणी : अचानक हालचालीने नागरिक दचकलेवर्धा : सणाच्या दिवसात कुठलीही अनुचित घटना घडल्यास पोलीस किती वेळात कुठे पोहोचू शकतात, याची चाचपणी जिल्हा पोलिसांच्यावतीने इतवारा परिसरात गुरुवारी सकाळी ११.३० वाजता करण्यात आली. या परिसरात अचानक पोलीस पथक अग्निशमनदल व रुग्णवाहिकेसह पोहोचाच नागरिकांत चांगलीच भीती निर्माण झाली होती. पोलिसांची ही रंगीत तालीम असल्याची माहिती मिळताच नागरिकांचा जीव भांड्यात पडला.दोन दिवसांवर ईद आहे. अशात इतवारा भाग ुगुन्हेगारीच्या दृष्टीने संवेदनशिल असल्याने येथे अनुचित घटना घडण्याची शक्यता असते. यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने ही रंगीत तालीम या भागात करण्यात आली. कोणाच्याही ध्यानीमनी नताना अचानक पोलीस ताफा पोहोचल्याने परिसरात चांगलीच दहशत पसरली होती. (प्रतिनिधी)जातीय तेढ निर्माण झाल्यास करण्यात येणाऱ्या कार्यवाहीचे प्रात्याक्षिक येत्या दोन दिवसावर ईद आहे. तर त्यानंतर हिंदू सणांना सुरुवात होेत आहे. या दिवसात जर जातीय तेढ निर्माण करणारी घटना घडली तर ती हाताळण्याकरिता करावयाची कारवाई पोलिसांना माहित व्हावी याकरिता ही मोहीम होती. ८० पोलिसांचा सहभाग या कारवाईत शहर ठाण्यातील व विशेष पथकातील एकूण ८० कर्मचाऱ्यांचा समावेश होता. शिवाय अधिकारीही सहभागी झाले होते. या रंंगीत तालमीत उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वानखेडे, वर्धेचे ठाणेदार एम. बुराडे, विजय मगर, सेवाग्राम ठाण्याचे निरीक्षक पराग पोटे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
इतवारा परिसरात पोलिसांची ‘मॉक ड्रील’
By admin | Published: July 17, 2015 2:07 AM