गिरड : समुद्रपूर तालुक्यात शेख फरीद बाबाच्या नावाने विदर्भात प्रख्यात गिरड या महत्त्वाच्या ग्रा़पं़ ची निवडणूक २२ एप्रिल रोजी होत आहे. एकूण ५ वॉर्ड असून १५ ग्रामपंचायत सदस्य आहेत. या निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे़येथे सध्या काँग्रेस-सेना अभद्र युतीची सत्ता आहे़ काँग्रेसचा सरपंच व सेनेचा उपसरपंच आहे. तीन वर्षांचा काळ खटल्यांतच गेल्याने गाव विकासापासून दूर राहिले़ येथील निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. १० ते १२ हजार लोकसंख्या असलेल्या गावात समस्यांचा डोंगर आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले असून सरपंच पदाचे आरक्षण जुनेच म्हणजे ओबीसी महिला आहे. प्रत्येक गट मोर्चेबांधणीतून मतदारांना आश्वासनाची खैरात वाटत आहे. निवडणूक हालचालींना वेग आला असून संभाव्य उमेदवार चाचपणे सुरू आहे. सर्वच राजकीय पक्ष कामाला लागल्याने उमेदवार पळवापळवी होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे़(वार्ताहर)
राजकीय हालचालींना आला वेग
By admin | Published: April 05, 2015 2:03 AM