लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक येत्या ११ एप्रिलला होऊ घातली आहे. एकूण १,९९५ मतदान केंद्रावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. यात ग्रामीण भागात १,५५९ तर शहरी भागासाठी ४३६ मतदान केंद्र राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.१ जानेवारी २०१९ पर्यंत वर्धा लोकसभा मतदारसंघात एकूण १७ लाख २४ हजार ५८१ मतदार असल्याची नोंद घेण्यात आली आहे. त्यात ८ लाख ८४ हजार ८५७ पुरुष तर ८ लाख ३८ हजार ४१३ महिला आणि २५ इतर मतदार आहेत. इतकेच नव्हे तर एकूण १ हजार २८६ सैनिक मतदार असून त्यात १ हजार २५२ पुरूष तर ३४ महिला मतदार आहेत. निवडणुकीची अधिसूचना १८ मार्चला प्रसिद्ध होताच नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाणार असून त्याची अंतिम तारीख २५ मार्चला आहे. २६ मार्चला अर्जाची छानणी झाल्यावर २८ मार्चला उमेदवाराला अर्ज मागे घेता येणार आहे. तर प्रचार तोफा ९ थंडावणार आहेत. ११ एप्रिलला प्रत्यक्ष मतदान होऊन २३ मे रोजी सेवाग्राम मार्गालगतच्या एफसीआय गोदाम परिसरात मतमोजणी होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या पत्रकार परिषदेला अप्पर जिल्हाधिकारी संजय दैने, जिल्हा प्रशासनातील प्रवीण महिरे, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे व अन्य अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.४,३९१ दिव्यांग मतदारलोकसभा निवडणुकीचे हे वर्ष दिव्यांगांसाठी सुलभ निवडणुका असे घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे दिव्यांग मतदारांची नावे मतदार यादीमध्ये फलॅगींग करण्यात आले आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत एकूण ४ हजार ३९१ दिव्यांग मतदारांची ओळख पटविण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांना व्हिलचेअर व मतदान केंद्रावर पोहोचविण्यासाठी आवश्यक सोई-सुविधा पुरविण्यात येणार आहेत. सध्या मतदार नोंदणीचा कार्यक्रम सुरू असल्याने या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता आहे.नामनिर्देशनापर्यंत चालणार नवीन मतदार नोंदणीसध्या नवीन मतदार नोंदणीचा कार्यक्रम सुरू असून उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम तारखेच्या एक दिवस पूर्वीपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. लोकसभा निवडणुकीची पूर्व तयारी जिल्हा प्रशासन व निवडणूक विभागाकडून पूर्ण झाली असून एकही मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये तसेच ही प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शी होण्यासाठी प्रयत्न होत आहेत, असेही जिल्हाधिकारी भिमनवार यांनी सांगितले.सुविधा, समाधान अन् सुगम ठरणार फायद्याचेलोकसभेची निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांना मिरवणूक, प्रचार सभा आदी विषयाची परवानगी घ्यावी लागते. विविध प्रकारच्या परवानगी एकाच ठिकाणाहून प्राप्त करता याव्या यासाठी सुविधा ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. नागरिकांसह मतदारांच्या विविध शंकाचे व समस्यांचे समाधान करण्यासाठी समाधान हे अॅप कार्यान्वित करण्यात आले आहे. तर विविध शासकीय विभागांची वाहने अधिग्रहित करण्यासाठी सुगम नामक अॅप तयार करण्यात आले आहे. या तिन्ही सुविधा फायद्याच्याच ठरणार आहेत.पायाभूत सुविधावर्धा लोकसभा मतदारसंघातील १ हजार ९९५ मतदार केंद्रांवर पिण्याचे पाणी, दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प, प्रसाधनगृह, दिशादर्शक फलक आदी पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.२८ सहाय्यकारी मतदार केंदनिवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे एकूण १ हजार ४०० मतदारांपेक्षा जास्त मतदार असलेल्या मतदान केंद्राच्या ठिकाणी सहाय्यकारी मतदार केंद्राची निर्मिती होणार आहे. त्यानुसार वर्धा लोकसभा मतदार क्षेत्रात एकूण २८ सहाय्यकारी मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात येणार आहे.तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांकलोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. याच दरम्यान कुणाकडून आचार संहितेचा भंग केल्यास त्याची तक्रार नागरिकांना सकाळी ९ ते रात्री ९ या कालावधीत सुरू राहणाºया १९५० या टोल फ्री क्रमांकावर तक्रारी करता येणार आहेत. सोमवारी, ११ मार्चला दुपारी १ वाजेपर्यंत एकूण ३४५ नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधून आपल्या शंकांचे समाधान करून घेत अधिकची माहिती जाणून घेतली. शिवाय सी-व्हिजिलन्स या मोबाईल अॅपद्वारेही आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी तक्रारी करता येणार आहेत.
१,९९५ मतदान केंद्रांवर होणार मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 9:44 PM
वर्धा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक येत्या ११ एप्रिलला होऊ घातली आहे. एकूण १,९९५ मतदान केंद्रावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. यात ग्रामीण भागात १,५५९ तर शहरी भागासाठी ४३६ मतदान केंद्र राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची माहिती, लोकसभेची निवडणूक : ग्रामीण भागात १,५५९ तर शहरात ४३६ मतदान केंद्र