लोकमत न्यूज नेटवर्कपवनार : येथील धाम नदीपात्रातील प्रदूषणाने यावर्षी कळस गाठला आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मूर्ती विसर्जन झाल्याने गाळ साचून पाण्याचा प्रवाह अवरूद्ध झाला आहे. परिणामी, पाणी पूर्णपणे दूषित झालेले आहे. प्रदूषणामुळे धाम नदीचा श्वास गुदमरू लागला आहे.या समस्येवर जिल्हा प्रशासनाकडून तत्काळ उपाययोजना न झाल्यास नागरिकांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागणार आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष देण्यात जिल्हा प्रशासन व स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला कोणताही रस नसल्याचे चित्र दिसत आहे.गेल्या अनेक दिवसांपासून नदीपात्रात मूर्तीचा गाळ आणि तणस पडून असल्याने ते जागीच सडले. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी सुटली आहे. धाम नदीपात्रात मोठ्या प्रमाणात घरगुती व सार्वजनिक गणेश मूर्तीचे विसर्जन झाले. त्यामुळे नदीपात्र पूर्णत: दूषित झाले आहे. पात्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. अनेक मूर्ती पाण्यात बुडत नसल्याने त्या तशाच अवस्थेत पडून आहेत. या वर्षी एकाच ठिकाणी मूर्ती विसर्जन झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदा पाऊस कमी पडल्याने नदीपात्रात पाणी नाही.दरवर्षी वाहते पाणी राहत असल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात गाळ साचत नव्हता. मात्र आता डोहातील पाण्यात पूर्णपणे गाळा जमा झाला आहे. याच नदीपात्रातून पवनार येथील ग्रामस्थांना पाणीपुरवठा होतो. या अशुद्ध पाण्यामुळे रोगराई पसरण्यास सुरूवात झाली आहे. मात्र असे असले तरी यावर कोणतीही उपाययोजना करण्यास स्थानिक ग्रामपंचायत व जिल्हा प्रशासनाने सुरूवात केलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.
धाम नदीपात्राला प्रदूषणाचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2018 9:48 PM
येथील धाम नदीपात्रातील प्रदूषणाने यावर्षी कळस गाठला आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मूर्ती विसर्जन झाल्याने गाळ साचून पाण्याचा प्रवाह अवरूद्ध झाला आहे. परिणामी, पाणी पूर्णपणे दूषित झालेले आहे. प्रदूषणामुळे धाम नदीचा श्वास गुदमरू लागला आहे.
ठळक मुद्देमूर्ती विसर्जनाने गाळ साचला : रासायनिक रंगांनी पाणी दूषित