लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लघु प्रकल्पांच्या देखभाल, दुरूस्तीची जबाबदारी अधिकारी, कर्मचाºयांची असते. यामुळे लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकारी, कर्मचाºयांनी लघु प्रकल्पांची सुरक्षा, देखभाल, दुरूस्तीची माहिती घेण्याकरिता पाहणी करणे गरजेचे असते; पण रोठा वन आणि टू या तलावाची सुरक्षा वाºयावर असल्याचेच दिसते. तलावाच्या भिंतींवर मोठी झाडे उगविली असल्याने भिंतींना धोका निर्माण झाला आहे.आर्वी लघु पाटबंधारे विभागांतर्गत येणाºया १९ पैकी १० लघु प्रकल्पांची पाहणी करण्यात आली. यात रोठा वन व टू तलावावर सुरक्षेच्या दृष्टीने अनेक त्रूट्या आढळून आल्या आहेत. या त्रूट्यांबाबत माहिती दिली असता संबंधित अधिकाºयांकडूनही चिंता व्यक्त केी जात आहे. सिंचनाच्या क्षेत्रात वाढ करता यावी म्हणून लघु, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांची निर्मिती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील मध्यम व मोठ्या प्रकल्पांसह लघु प्रकल्पांचीही शेतकºयांना बºयापैकी साथ लाभत असते; पण त्यांच्या देखभाल, दुरूस्तीबाबत प्रशासन गंभीर नसल्याने जिल्ह्यातील तलावांवर अवकळा आली आहे. रोठा वन व टू या तलावांवर कुठेही सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना केलेल्या नाहीत. सिंचनासाठी पाणी सोडता यावे म्हणून बांधलेल्या पाटचºयाही बुजलेल्या स्थितीत आहे. यामुळे या तलावातून सिंचन होत की नाही, हा प्रश्नच आहे.धरणे, तलावांच्या भिंतींवर कुठल्याही प्रकारचे गवत, झाडे उगवू नयेत, असे तज्ञांकडून सांगितले जाते. असे असले तरी रोठा व व टूच्या भिंतींवर मोठी झाडे असल्याचे दिसते. १२ ते १५ फुट उंच झाडांच्या मूळा तलावाच्या भिंतींमध्ये खोलवर रूतलेल्या आहेत. यामुळे तलावाची भिंत कमकुवत होत असल्याचे दिसून येत आहे. यावरून मागील कित्येक वर्षांपासून या तलावाची पाहणीच करण्यात आली नसल्याचे स्पष्ट होते. मग, प्रकल्पांच्या देखभाल, दुरूस्तीसाठी येणारा निधी खर्च कुठे होतो, असा प्रश्न उपस्थित होत आहे.तलावाच्या भिंतीवर केलेले दगडाचे पॅचेस दूरवरून दिसले पाहिजे. धरण, तलावाची भिंत चारचाकी जड वाहन जाऊ शकेल इतकी रूंद असणे गरजेचे असते. असे असले तरी दोन्ही तलावांच्या भिंती अत्यंत अरुंद आहेत. त्यावरून पायी चालणेही कठीण होते. पावसामुळे भिंतीची रूंदी कमी होत आहे. तलावाची देखभाल, दुरूस्ती केली असती तर ही बाब अधिकाºयांच्या लक्षात आली असती. यावरून पाहणीच झाली नसल्याचे दिसते. प्रकल्पांच्या देखभाल, दुरूस्तीकरिता येणाºया खर्चाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जातो. यावरून शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जातो; पण प्रकल्पांची पाहणी, दुरूस्ती होतच नाही. यामुळे शासनाचा निधी जातो कुठे, हा प्रश्नच आहे.निधीच्या कमतरतेचा डांगोराजिल्ह्यातील सिंचन, पिण्याचे पाणी तथा उद्योगांकरिता दिले जाणारे पाणी मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पांतून दिले जाते. हा पाणी पुरवठा कायम राहण्यासाठी सर्व प्रकारच्या प्रकल्पांची देखभाल, दुरूस्ती करणे अत्यंत गरजेचे असते; पण जिल्ह्यातील ही यंत्रणा या प्रकल्पांकडेच दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. लघु पाटबंधारे विभागाकडून नेहमीच निधीच्या कमतरतेचा डांगोरा पिटला जात असल्याचेही सर्वश्रूत आहे. मग, प्रकल्प वाºयावर सोडून द्यायचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.कित्येक वर्षे रेंगाळत असल्याने देखभाल, दुरूस्तीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांचे कालवे, पाटचºया नादुरूस्त आहेत. अनेक तलावांची तर दयनिय अवस्था झाली आहे. रोठा वन व टू परिसरात तर स्वैराचारच पाहावयास मिळतो; पण कुठलाही अधिकारी त्या तलावांकडे फिरकत नसल्याचे दिसते. यामुळे लघु पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देत चौकशी करणेच गरजेचे झाले आहे.या प्रकरणी सहायक कार्यकारी अभियंत्या प्रगती यादव यांना विचारणा केली देखभाल, दुरूस्तीकरिता कमी निधी येतो. याबाबत अधिक माहिती पाहिजे असल्यास आरटीआय अंतर्गत अर्ज द्या आणि माहिती घ्या, असे सांगितले.दोन महिन्यांपूर्वीच कार्यभार सांभाळला आहे. अद्याप प्रकल्पांच्या देखरेख, दुरूस्तीकरिता शासनाकडे निधीचा प्रस्ताव पाठविण्यात आलेला नाही.- विकास बढे, कनिष्ठ अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, आर्वी.
तलावाच्या भिंतींनाही धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 10:30 PM
लघु प्रकल्पांच्या देखभाल, दुरूस्तीची जबाबदारी अधिकारी, कर्मचाºयांची असते.
ठळक मुद्देरोठा वन व टू मधील प्रकार : पाटचºया बुजलेल्या स्थितीत