लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : दिवसेंदिवस नियोजनाअभावी पाण्याची समस्या बिकट होत होत आहे. याकडे समस्त समाजव्यवस्थेकडून दुर्लक्ष होत आहे. पिण्याच्या पाण्यासहीत जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न गंभीर होत आहे. ही समस्या निवारण्याकरिता तातडीने प्रयत्न न झाल्यास या जमिनीवर पाण्यासाठी तिसरे महायुध्द होते की काय अशी स्थिती निर्माण होवू पाहत आहे, असे विचार खा. रामदास तडस यांनी व्यक्त केले. तळणी भागवत येथे वॉटर कप स्पर्धेसाठी आयोजित श्रमदानाप्रसंगी ते बोलत होते.याप्रसंगी पं.स. सदस्य युवराज खडतकर, सरपंच अनका गणेश वरकडे, उपसरपंच सुचिता शेंदरे, मुख्यमंत्री ग्रामविकास फेलो सुदर्शन पवार तसेच ग्रा.पं. सदस्यांची उपस्थिती होती.खा. तडस पुढे म्हणाले, शासनाने वॉटर कप स्पर्धेसाठी या तालुक्यातील ६४ गावांची निवड केली आहे. गाव पाणीदार झाले पाहिजे यासाठी सर्वांचे प्रयत्न महत्त्वपुर्ण ठरले आहे. तळणी भागवत येथील नागरिक, महिला व आबालवृध्द सतत ४५ दिवसपर्यंत श्रमदानासाठी राबणार आहे. यासाठी महिलांचा व बालकांचा उत्साह सर्वांना प्रेरीत करणारा ठरला आहे. त्यामुळे या कामासाठी जेसीबीच्या डिझेलसाठी लागणारा एक लाखाचा खर्च स्वत: उचलणार आहे, असे त्यांनी सांगितले.वॉटर कप स्पर्धेसाठी तळणी भागवत येथील गावकरी सहा दिवसापासून श्रमदान करीत आहे. या दिवसात पाचशे घनमीटर खोदकाम करण्यात आले आहे. श्रमदानातून सर्वांचा उत्साह ओसांडून वाहत आहे. जल है तो कल है, अन्न गुडगुडे, नाळ गुडगुडे, दुष्काळ, ढिशकॉन, ढिशकॉन अशा प्रकारचे नारे लावून परस्परांमध्ये उत्साह संचारित केला जात आहे. या कामात गावातील ८५ वर्षाच्या म्हताºयापासून तर बालकापर्यंत सहभाग दिला जात आहे. वॉटर कप स्पर्धेचे बक्षीस मिळविण्यासाठी या गावातील सर्वजन एकवटले आहे. गावातील नागरिकांचा उत्साह द्विगणीत करण्यासाठी खा. तडस यांनी श्रमदान करून सहभाग दिला.श्रमदानात गावातील सरपंच व उपसरपंचासहीत ग्रा.पं. सदस्य गजानन तिवरे, कोमल वरठी, ज्योत्स्ना घनकसा, पाणी फाऊंडेशनचे प्रशिक्षणार्थी गजानन कन्नाके, रेखा बेलखोडे, रवि चिंचे तसेच रमेश तिवरे, दुर्योधन थुल, श्याम बरडे, संजय गोडे, सुभाष शेंदरे, हरिभाऊ मानकर, गुलाब आतराम तसेच गावकरी योगदान देत आहे.अख्ख गावंच आलं श्रमदानालाजिल्ह्यात आलेल्या वॉटरकप स्पर्धेच्या तुफानात अख्ख गाव येत असल्याचे दिसत आहे. गावात कधी पाण्याची टंचाई जाणवणार नाही याकरिता नागरिकांकडून श्रमदान करण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. गावातील चिमुकल्यांसह ८५ वर्षाच्या म्हाताºयानेही श्रमदानाला आपली उपस्थिती दर्शविली. तळणी येथे तर सकाळी अख्ख गावच माळरानात श्रमदानात सहभागी झाल्याचे दिसले.
पाणी समस्येमुळे तिसऱ्या महायुद्धाची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 11:58 PM
दिवसेंदिवस नियोजनाअभावी पाण्याची समस्या बिकट होत होत आहे. याकडे समस्त समाजव्यवस्थेकडून दुर्लक्ष होत आहे. पिण्याच्या पाण्यासहीत जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न गंभीर होत आहे. ही समस्या निवारण्याकरिता तातडीने प्रयत्न न झाल्यास या जमिनीवर पाण्यासाठी तिसरे महायुध्द होते की काय अशी स्थिती निर्माण होवू पाहत आहे, असे विचार खा. रामदास तडस यांनी व्यक्त केले.
ठळक मुद्देरामदास तडस : तळणी (भागवत) येथे श्रमदान