शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
6
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
7
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
8
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
9
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
10
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
11
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
12
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
13
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
14
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
15
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
16
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
17
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
18
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
19
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
20
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा

डाकघरातून पळविलेली रक्कम ठेवीदारांची

By admin | Published: February 07, 2017 1:13 AM

सेवाग्रात येथील ऐतिहासिक डाक कार्यालयात चोरट्यांनी गॅस कटरने तिजोरी कापून सुमारे १ लाख १९ हजार रुपयांची रक्कम लंपास केली.

सुगावा नाही : तपासाकरिता दोन चमू तयारवर्धा : सेवाग्रात येथील ऐतिहासिक डाक कार्यालयात चोरट्यांनी गॅस कटरने तिजोरी कापून सुमारे १ लाख १९ हजार रुपयांची रक्कम लंपास केली. ही रक्कम डाक कार्यालयातील दैनंदिन व्यवहाराची नसून ती ठेवीदारांचीच होती, अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. मात्र, चोरट्यांपर्यंत पोहोचण्याचा कुठलाही सुगावा मिळविण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही. चोरी झाली ते डाकघर बापूकुटीपासून काही अंतरावर आहे. या डाकघरात सीसीटीव्ही कॅमेरा नाही; पण काही अंतरावर असलेल्या बापूकुटीच्या प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही आहे. या कॅमेऱ्यात चोरट्यांच्या हालचाली कैद झाल्या असाव्या असा अंदाज पोलिसांना असल्याने त्यांनी या कॅमेऱ्याचे फुटेज तपासण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यातही काहीच मिळून आले नाही. गॅस कटरचा वापर करून तिजोरी कापणारी टोळी जिल्ह्यातील की इतर भागातील याचा अंदाज बांधने कठीण असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या चोरीच्या तपासासाठी दोन चमू तयार करण्यात आले असून त्यांच्याकडून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सध्या हाती काहीच आले नसून या टोळीने एकच चोरी केली नसावी. अशा आणखी चोऱ्या केल्या असाव्या असा संशय ठाणेदार पिदुरकर यांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)