लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : समृद्धी महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे इटाळ्यातील १५० एकर शेतात जाणारे पाटबंधाºयाचे पाणी अडले होते. त्या शेतकऱ्यांच्या शेतात १५ पर्यंत पाटाचे पाणी पोहोचविण्याची हमी वर्धा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी लेखी दिल्याने मार्ग सुकर होण्याची शक्यता आहे.इटाळा मौजातील १७ शेतकऱ्यांनी निवेदन दिले होते. वर्धा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी शुक्रवारी दुपारी मोक्का पाहणी केली. यावेळी महाबळाच्या सरपंच ज्योत्स्ना पोहाणे व शेतकरी उपस्थित होते. मोक्का पाहणी केल्यानंतर बोर प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील कालव्यावर समृद्धी महामार्गाच्या भरावाचे काम केल्याने शेतकऱ्यांना पाणी देण्याची व्यवस्था करून देण्यात यावी. पाणी मिळाले नाही तर २५० एकर क्षेत्र सिंचनापासून वंचित राहणार आहे. याकरिता १५ डिसेंबर २०१९ च्या आत शेतकºयांच्या शेतात पाटाचे पाणी जाईल याची व्यवस्था करण्याच्या दृष्टीने पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी एस.इ. एन्ड प्रोजेक्ट डायरेक्टर, नागपूर, जिल्हाधिकारी, कार्यकारी अभियंता, प्रकल्प व्यवस्थापक अॅफकॉन्स इन्फ्रॉस्ट्रक्चर लि. सेलू यांना पत्र दिले आहे. त्यामुळे सिंचनाचा मार्ग सुकर झाला आहे.
शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचणार पाटाचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2019 6:00 AM
इटाळा मौजातील १७ शेतकऱ्यांनी निवेदन दिले होते. वर्धा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी शुक्रवारी दुपारी मोक्का पाहणी केली. यावेळी महाबळाच्या सरपंच ज्योत्स्ना पोहाणे व शेतकरी उपस्थित होते. मोक्का पाहणी केल्यानंतर बोर प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील कालव्यावर समृद्धी महामार्गाच्या भरावाचे काम केल्याने शेतकऱ्यांना पाणी देण्याची व्यवस्था करून देण्यात यावी.
ठळक मुद्देकार्यकारी अभियंत्यांनी दिले आश्वासन