लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : पढेगाव, चिकणीसह संपूर्ण जिल्ह्याला मंगळवारी वादळीवाऱ्याने तडाखा दिला. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याकरिता नुकसानभरपाईची मागणी केली गेली. महसूल विभागाने याची नोंद घेतली. तसेच खासदार, आमदारांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणीसुद्धा केली. मात्र, अद्याप वीजपुरवठा पूर्णत: सुरळीत झालेला नाही. यामुळे अद्रक लागवड धोक्यात आली आहे.जिल्ह्यातील पढेगाव येथील शेतकरी सुरेश बापुराव महाकाळकार यांनी १ जून ला मौजा (धोत्रा रेल्वे) शिवारात ओलीताखाली असलेल्या ०.५० हे.आर. शेतात अद्रकाची लागवड केली. याकरिता त्यांना १२ क्विंटल अद्रकाचे बेणे लागले. बेण्यांसह त्यांना दीड लाख रूपये खर्च आला. यावर्षी अद्रकाचे विक्रमी उत्पन्न घेण्याचे स्वप्न धुळीस मिळाल्याचे महाकाळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.१ जूनला लागवड केलेल्या अद्रकाच्या शेताला पाण्याची नितांत गरज असतानाच ४ जूनला झालेल्या वादळीवाऱ्यामुळे कृषिपंपाला वीज पुरवठा करणाºया तारा तुटल्या, खांबही वाकलेत. यामुळे महाकाळकर यांच्या कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे लागवड झालेले अद्रक पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्याचे शेतकऱ्याने सांगितले. याकरिता सदर शेतकºयाने सावंगी (मेघे) येथील कार्यकारी अभियंता कार्यालयात तक्रार दाखल केली. परंतु, अद्यापही वीज पुरवठा सुरळीत झालेला नाही. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.दोन दिवसात जर अद्रक लागवड केलेल्या शेताला पाणी मिळाले नाही तर मोठे नुकसान होईल.- सुरेश महाकाळकर, पढेगाव.
वीजपुरवठा खंडितच; लागवड केलेले अद्रक धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 10:15 PM
पढेगाव, चिकणीसह संपूर्ण जिल्ह्याला मंगळवारी वादळीवाऱ्याने तडाखा दिला. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याकरिता नुकसानभरपाईची मागणी केली गेली. महसूल विभागाने याची नोंद घेतली.
ठळक मुद्देकृषिपंप जोडणी तुटल्या, खांबही वाकले : शेतकऱ्याचे दीड लाखाचे नुकसान होण्याच्या मार्गावर