शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 
2
Ajmer Sharif: "आता चंद्रचूड प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत बसलेत"; असदुद्दीन ओवेसी भडकले 
3
IND vs AUS: वर्षभर 'फ्लॉप शो', मात्र ऑस्ट्रेलियात 'विराट' कमबॅक; गावसकरांनी सांगितलं शतकामागचं रहस्य
4
ऑस्ट्रेलियन PM अँथनी अल्बानीज यांनी घेतली टीम इडियाची भेट; किंग कोहलीसोबतचा संवाद चर्चेत (VIDEO)
5
प्रकाश आंबेडकरांना सोबत न घेणे भोवले? मविआला २० ठिकाणी फटका; सर्वाधिक नुकसान शरद पवारांचे!
6
Maharashtra Politics : ज्यावेळी भाजपला मुख्यमंत्री निवडण्यासाठी ७२ तास लागले,तेव्हा धक्कातंत्र वापरले, नवीन चेहरे आले समोर
7
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून शिंदे बाहेर, फडणवीसवर सस्पेन्स कायम; BJP कसा घेणार निर्णय?
8
महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती मतदान? लोकसभेपेक्षा विधानसभेला महायुतीची किती मते वाढली, आकडेवारी पहाल तर...
9
कोणीही मुख्यमंत्री झाले तरी...; देवेंद्र फडणवीस CM होण्याची शक्यता असतानाच मनोज जरांगेंचा इशारा
10
"बच्चू कडूंना महायुतीमध्ये घेण्याची आवश्यकता नाही, त्यांनी…", भाजपच्या वरिष्ठ नेत्याची स्पष्ट भूमिका
11
Gold Silver Price Today 28 November: तेजीनंतर सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; पाहा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे नवे दर
12
पराभवानंतर शहाजीबापू पाटील पहिल्यांदाच बोलले, कारणही सांगितलं, म्हणाले, "ठाकरे, पवार, राऊतांनी..."
13
देवेंद्र फडणवीसांनी ओबीसींच्या हक्कांसाठी काम केलं; भुजबळांनी केलं तोंडभरून कौतुक!
14
'फॉरेनची पाटलीण' फेम अभिनेता आठवतोय का? तब्बल १० वर्षांनी करतोय कमबॅक; म्हणाला...
15
Pune: लिव्ह इन पार्टनरला संपवलं, मुलाला सोडलं आळंदीत; पुण्यातील भयंकर घटनेची Inside Story
16
Health Tips: भातप्रेमींनो, 'या' पद्धतीने शिजवा भात! कितीही खाल्लात तरी सडसडीत राहाल!
17
डोनाल्ड ट्रम्प यांचं अमेरिकेत प्लॅनिंग! भारतात वाढला सोन्याचा भाव; कुठेपर्यंत जाणार वाढती किंमत
18
भयंकर! बॉयफ्रेंडशी बोलताना झालं डिस्टर्ब; संतापलेल्या आईने लेकीला टेरेसवरुन फेकलं अन्...
19
Guru Pradosh 2024: आनंद, ऐश्वर्यप्राप्तीसाठी आज प्रदोष मुहूर्तावर राशीनुसार करा शिव उपासना!
20
मविआ फुटणार, पालिकेत ठाकरे गट स्वतंत्र लढणार? चर्चांनंतर संजय राऊतांचं सूचक विधान, म्हणाले... 

वर्ध्यात विद्युत कर्मचाऱ्यांनी मोडली ऊर्जा मंत्र्यांच्या नावाने बोटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2019 3:35 PM

तीन दिवसीय संपात सहभागी महानिर्मिती, महापारेषण व महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी बोरगाव (मेघे) येथील वीज वितण कंपनीच्या कार्यालयासमोर एकत्र येत कामगार विरोधी धोरणाचा निषेध नोंदविला.

ठळक मुद्देढोलकीच्या तालावर निषेध नोंदवून वेधले मागण्यांकडे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: तीन दिवसीय संपात सहभागी महानिर्मिती, महापारेषण व महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी बोरगाव (मेघे) येथील वीज वितण कंपनीच्या कार्यालयासमोर एकत्र येत कामगार विरोधी धोरणाचा निषेध नोंदविला. टाळ व ढोलकीच्या तालावर आंदोलनकर्त्यांनी ऊर्जा मंत्र्यांच्या नावाने बोटेही मोडली. इतकेच नव्हे तर एकापेक्षा एक भजन सादर करून आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.महापारेषण कंपनीतील स्टाप सेटअप लागू करीत असताना एकूण मंजूर पदे कमी न करता अंमलात आणावे. महावितरण कंपनीतील प्रस्तावित पुनर्रचना संघटनांनी सुचविलेल्या सुचनांचा अंतर्भाव करूनच अंमलात आणावा. शासन व व्यवस्थापनाने महावितरण कंपनीने राबविण्यात येत असलेले खाजगीकरण करण्याचे धोरण थांबवावे. मुब्रा, कळवा आणि कालेगावचे विभाग फ्रेन्चाईसीवर खाजगी भांडवलदार कंपनीने देण्याची प्रक्रिया ताताडीने थांबविण्यात यावी. महानिर्मिती कंपनीच्या अधिकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या लघु जल विद्युत निर्मिती संचाने शासनाने अधिग्रहण न करता महानिर्मिती कंपनीच्या अधिकार क्षेत्रात कार्यरत ठेवावे. महानिर्मिती कंपनीच्या २१० मे.व्हॅ.चे संच बंद करण्याचे धोरण थांबवावे. महाराष्ट्र सरकारच्या मंत्रीमंडळ समितीने तिन्ही कंपन्यातील सर्व कर्मचाºयांकरिता मान्य केलेली जुनी पेंशन योजनेच्या धर्तीवरील पेंशन योजना लागू करण्यात यावी. तिन्ही कंपनीतील रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी. शिवाय बदली धोरणाचा पुनर्रविचार संघटनेसोबत चर्चा करून करावा. त्यानंतर बदलीचे धोरण अंमलात आणावे. महावितरण, पारेषण व महानिर्मिती या कंपन्यांमधील कंत्राटी व आऊटसोर्सिंग कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने कायम कामगार म्हणून सामावून घ्यावे, या मागण्यांसाठी हे आंदोलन संयुक्त कृती समितीच्या नेतृत्त्वात करण्यात आले. आंदोलनात सुरेश गोसावी, मनोहर उईके, अरविंद डबुरकर, सचिन सोनस्कर, विवेक कोठारे, संदेश फुलपाटील, खुशाल झाडे, नरेश भारद्वाज, सुनील तडस, डी.एम. देशमुख, दिलीप तडस, मैथीली खटी, राधा बोपचे यांच्यासह महा.स्टेट इले. वर्कर्स, फेडरेशन, महा. वीज कामगार महासंघ (बी.एम.एस.), विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन, सवॉर्डिनेट इंजिनियर असोसिएशन, महाराष्ट्र राज्य वीज कामगार काँग्रेस (इंटक), महाराष्ट्र राज्य तांत्रिक कामगार संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :agitationआंदोलन