शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; शिवसेना नेत्याचा दावा, नेमकं काय घडतंय?
2
विधानसभेत ७८ नवीन चेहरे, जे पहिल्यांदाच आमदार बनले; कोणत्या पक्षाचे किती सदस्य?
3
काँग्रेसनं कोणत्या मार्गावर चालायला हवं? राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं, ओढली 'लक्ष्मणरेषा'!
4
"2012 पर्यंत हरी मंदिर होते...", संभलच्या शाही जामा मशिदीसंदर्भात भाजप आमदाराचा नवा दावा! शेअर केले PHOTO
5
"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"; धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप!
6
Mumbai Indians फिरवली पाठ, Ishan Kishan ने ठोकले ९ षटकार, अवघ्या २७ चेंडूत जिंकवली मॅच
7
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
8
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
9
₹6 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, 600% नं वाढला भाव; या मोठ्या कंपनीनं 1600000 शेअरवर लावलाय 'डाव'!
10
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
11
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
12
टीम इंडियाने लाँच केली नवी जर्सी, झाला महत्त्वाचा बदल; पहिल्यांदा कधी मैदानात कधी दिसणार?
13
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
14
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
15
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
16
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
17
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
19
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
20
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...

पं.स. इमारतीला यंदाही ताडपत्रीचा आधार

By admin | Published: June 02, 2017 2:08 AM

सेलू तालुक्यातील ६२ ग्रा.पं. अंतर्गत येणाऱ्या गावांचा कारभार पाहणाऱ्या पंचायत समितीला मागील कित्येक वर्षांपासून इमारतच मिळेणा झाली आहे.

कार्यालयाची व्यथा : पहिल्याच पावसाने गळतीलोकमत न्यूज नेटवर्कघोराड : सेलू तालुक्यातील ६२ ग्रा.पं. अंतर्गत येणाऱ्या गावांचा कारभार पाहणाऱ्या पंचायत समितीला मागील कित्येक वर्षांपासून इमारतच मिळेणा झाली आहे. परिणामी, जुन्याच इमारतीची वारंवार डागडुजी केली जात असून प्रत्येक पावसाळ्यात ताडपत्री आच्छादली जाते. यंदाही येथील पंचायत समितीला ताडपत्रीचाच आधार असल्याचे दिसून येते.६२ ग्रा.पं. चा कारभार पंचायत समिती कार्यालयातून चालतो. सध्या त्या पं.स. लाच इमारत नाही. यावर्षीही पंचायत समितीच्या इमारतीला पावसाळा लागताच ताडपत्रींचे पांघरून घेण्याची वेळ आली आहे. या इमारतीला ‘अच्छे दिन’ची प्रतीक्षा कधी संपणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मागील तीन वर्षांपासून ही इमारत ताडपत्रीचा आधार घेत आहे. बुधवारी आलेल्या दमदार पावसामुळे ही इमारत गळू लागली आणि कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. पंचायत, कृषी, आस्थापना विभागातील संगणक खराब होऊ नये म्हणून अधिकारी, कर्मचारी काळजी घेत होते. पंचायत विभागात गुरूवारी सकाळी तळे साचून असल्याचे पाहावयास मिळाले. बुधवारी पंचायत समिती कार्यालयाला गळती लागल्याने गुरूवारी सकाळपासूनच ताडपत्री टाकण्याचे काम सुरु करण्यात आल्याचे दिसून आले. तालुक्यात कोट्यवधी रुपयांची विकास कामे सुरु असल्याचा गवगवा केला जात आहे; पण या इमारतीवरील फुटलेले कवेलू बदलण्यासही निधी मिळू नये, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. सेलू तालुक्यातील जीर्ण शासकीय इमारतींकडे लोकप्रतिनिधी तथा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे झाले आहे.