प्रशासनाला साकडे : जिल्हा व तालुका समित्या स्थापन करावर्धा : राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता! मात्र याचे विस्मरण होऊन २६ जानेवारी या दिवशी मोठ्या अभिमानाने मिरवले जाणारे कागदी किंवा प्लास्टिकचे राष्ट्रध्वज त्या दिवसापासूनच रस्त्यावर अन् गटारात फाटलेल्या अवस्थेत आढळतात. शिवाय प्लास्टिकच्या वापरामुळे ते लगेच नष्ट ही होत नाहीत आणि अनेक दिवस राष्ट्रध्वजाची ही विटंबना पहावी लागते. ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये याची काळजी घ्यावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले आहे.ही विटंबना रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका (१०३/२०११) दाखल केली आहे. याचा प्रतिसाद म्हणून न्यायालयाने शासनाला राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याचे आदेश दिले आहेत. हिंदु जनजागृती समिती १० वर्षांपासून राष्ट्रध्वजाच्या अवमानाविरोधात कार्यरत आहे. त्यासाठी शाळांमधून व्याख्याने आणि प्रश्नमंजुषा घेणे, जनजागृतीपर ध्वनीचित्रफित स्थानिक केबल आॅपरेटरच्या माध्यमातून दाखवणे, फ्लेक्स लावणे, हस्तपत्रकांचे वाटप करणे, सामाजिक संकेतस्थळावरुन मोहीम राबविणे आदी माध्यमातून समिती प्रयत्न करत आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार आणि डिसेंबर २०१४ च्या गृह विभागाच्या परिपत्रकानुसार (गृह विभाग, परिपत्रक कं्र. ०३१३/७१४/प्र. क्र. ६२/ विशा १ अ, दि. डिसेंबर २०१४) शासनाच्यावतीने राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर कृती समिती स्थापन करण्यात यावी. कार्यक्षेत्रातील शाळांमधून राष्ट्रध्वजाच्या सन्मानाविषयी जनजागृतीपर व्याख्याने आणि प्रश्नमंजुषा घेण्यासाठी हिंदु जनजागृती समितीला सहभागी करण्यात यावे. राज्यशासनाने पोलीस ठाण्यांना विशेष सूचना देऊन रस्त्यावर आणि अन्य ठिकाणी पडलेले राष्ट्रध्वज गोळा करण्याचे नियोजन करुन ध्वजसंहितेनुसार त्याचे विसर्जन करावे, अशी मागणी निवासी जिल्हाधिकारी वैभव नावडकर, पोलीस उपअधीक्षक आर.जी. किल्लेकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सुनंदा हरणे, हिंदु जनजागृती समितीचे सुमती सरोदे आदींची उपस्थिती होती.(शहर प्रतिनिधी)जनजागृतीची गरजशाळांमधून व्याख्याने आणि प्रश्नमंजुषा घेणे, जनजागृतीपर ध्वनीचित्रफित स्थानिक केबल आॅपरेटरच्या माध्यमातून दाखवणे, फ्लेक्स लावणे, हस्तपत्रकांचे वाटप करणे, सामाजिक संकेतस्थळावरुन मोहीम राबविणे आदी माध्यमातून समिती प्रयत्न करत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा
By admin | Published: January 24, 2016 2:00 AM