शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: अतुल परचुरे... तो आहे आमच्याबरोबर, आम्ही असेपर्यंत...
2
आजचे राशीभविष्य: ६ राशींना धनलाभ योग, कामात उत्तम यश; फायद्याचा आनंदी दिवस
3
विधानसभा निवडणूक: जागावाटपावर खलबते! मविआची चर्चा ट्रॅकवर, महायुतीचेही ठरले...
4
पिस्तूल, हत्यारे मिळतात तरी कशी? मुंबईतील नागरिकांच्या सुरक्षेबाबत वाटू लागली चिंता
5
निवडणूक विशेष लेख: कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या; सत्तेची खुर्ची मात्र आम्हालाच द्या..!
6
नववी, दहावी अभ्यासक्रमात ३ विषयांची भर; शेती, नळ दुरुस्ती, बागकाम, सुतारकामाचा समावेश
7
बोन ऑसिफिकेशन टेस्ट म्हणजे काय? ही चाचणी कशी केली जाते? वाचा सविस्तर
8
संकष्ट चतुर्थी: चंद्रोदयाची वेळ काय? व्रताचरण कसे करावे? पाहा, महत्त्व, मान्यता अन् महात्म्य
9
कार्यालयीन वेळेनंतर चौकशी नाही; मुंबई उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर EDचे परिपत्रक
10
अभ्यासाच्या वह्या, पाण्याचा जार, सायकल स्वस्त होणार; विम्यावर सूट; घड्याळे, बूट महागणार!
11
गजकेसरी पंचराजयोगात संकष्ट चतुर्थी: ५ राशींना यश, सरकारी लाभ; प्राप्तीत वाढ, सर्वोत्तम काळ!
12
७०हून जास्त विमानांत बॉम्बची धमकी; २४ तासांत ३० विमानांचे आपत्कालीन लँडिंग, ८० काेटींचा फटका
13
मरगळलेल्या ‘मरे’ची कूर्मगती; डबा घसरल्याचे कारण, प्रवाशांना घरी पोहोचायला उजाडली पहाट
14
JJ रुग्णालयात गोळीबार करणाऱ्या आरोपीला ३२ वर्षांनी अटक; नाव बदलून दडवली होती ओळख
15
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या भावाला अटक; फसवणुकीच्या एका प्रकरणात कारवाई
16
तळोजा गृहनिर्माण प्रकल्प: बिल्डर टेकचंदानीला मालमत्ता परत करणार; ‘ईडी’ने जारी केली नोटीस
17
मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले पावणे दोन कोटींचे सोने
18
गोपीनाथ मुंडे आज असते, तर अजित पवारांना भाजपसोबत घेतलं असतं का?; धनंजय मुंडे म्हणाले...
19
माझी लाडकी बहीण योजना बंद होण्याची चर्चा; अदिती तटकरेंनी केला खुलासा 
20
Bhagyashree Navtake IPS: १२०० कोटींचा घोटाळा, सीबीआयचा गुन्हा; कोण आहेत भाग्यश्री नवटके?

केळी विक्रेत्याला सश्रम कारावास

By admin | Published: February 15, 2017 2:14 AM

रसायन वापरून केळी पिकविणाऱ्याच्या प्रकरणात येथील एका विके्रत्याला एक वर्षांचा सश्रम कारावास

रसायनाने पिकवित होता केळी : जिल्ह्यातील तिसरे प्रकरण वर्धा : रसायन वापरून केळी पिकविणाऱ्याच्या प्रकरणात येथील एका विके्रत्याला एक वर्षांचा सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हा निकाल मुख्य दंडाधिकारी एस.एन.माने यांनी दिला. दंड न भरल्यास आरोपीला आणखी एक महिन्याची साधी शिक्षा भोगावी लागेल. शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव संजय महादेव ढोके असे असून त्याचे इतवारा बाजारात संजय महादेव ढोके फ्रुट मर्चट व कमिशन एजंट या नावाने दुकान आहे. सविस्तर वृत्त असे की, अन्न भेसळ प्रतिबंधक कायद्यांतर्गत इथेनॉन या रसायनाचा केळी पिकविण्याकरिता संजय ढोके फ्रुट मर्चट व कमिशन एजंट, इतवारा येथे वापर होत असल्याबाबतची माहिती तत्कालीन अन्न निरीक्षक सु.पै. नंदनवार यांना मिळाली. त्यांनी या दुकानाला भेट दिली असता तिथे प्रतिबंधीत इथेपॉन या रसायनाच्या द्रावणामध्ये कच्या केळी बुडवून त्याचा वेगळा ढीग लावल्याचे आढळून आले होते. त्यांनी या संदर्भात विचारणा केली असता त्यांच्याकडून योग्य उत्तर मिळून आले नाही. यामुळे अधिकाऱ्यांनी पंचनामा करून या केळींचा व इथेपॉन या रसायनाचा नमुना विश्लेषणाकरिता देण्यात आला होता. विश्लेषणाअंती इथेपॉन या प्रतिबंधीत रसायनाचा वापर केळी पिकविण्याकरिता करण्यात आल्याचे प्राप्त झालेल्या अहवालातून निष्पन्न झाले. या प्रकरणात तपास, चौकशी पूर्ण करून आरोपीविरूद्ध मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्या न्यालयात अन्न भेसळ प्रतिबंधक कायद्यांतर्गत दोन खटले २०१० मध्ये दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात न्यायाधीशासमक्ष साक्ष पुरावे नोंदविण्यात आले. सरकार आणि आरोपींच्या बाजूने युक्तिवाद करण्यात आला. या युक्तिवादातून इथेपॉन या रसायनाचा वापर केळी पिकविण्याकरिता केल्याचे निष्पन्न झाले. यामुळे संजय ढोके याला शिक्षा ठोठावण्यात आली. या प्रकरणात शासनाच्यावतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता एस.डी. थूल यांनी युक्तिवाद केला. या खटल्याचा पाठपुरावा अन्न सुरक्षा अधिकारी ललीत सोयाम, रविराज धाबर्डे, एस.पी. नंदनवार यांनी केला.(प्रतिनिधी)