लोकमत न्यूज नेटवर्कमांडगाव : परिसरातील रुग्णांची ने-आण करण्याकरिता शासनाकडून येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. परंतु, कर्मचारी रुग्णवाहिकेचा वापर घरगुती कामासाठी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका आज दुपारी बेघर वस्तीत उभी असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे येथे कोणी आजारी तर पडले नाही ना, हे बघण्याकरिता गावातील काही तरुणांनी तिकडे जाऊन पाहणी केली. तेव्हा रुग्णालयातील शिपाई घरातील साहित्य या रुग्णवाहिकेत भरत असताना दिसून आला. त्यामुळे युवकांनी त्याला विचारपूस केली असता उडवाउडवीचे उत्तर दिले. गावातील एखादा रुग्ण आजारी असल्यास त्याच्याकरिता रुग्णवाहिका बोलावल्यास चालक ५०० रुपयाची मागणी करतो.आवश्यकता पडल्यास वेळेवर रुग्णवाहिका पोहोचत नाही. असे असतानाही कर्मचाºयांच्या घरगुती वापराकरिता रुग्णवाहिका कशी उपलब्ध होते, असा संतप्त प्रश्न गावकºयांकडून उपस्थित होत आहे. तसेच आज शिपायांने या रुग्णवाहिकेचा खासगी कामाकरिता वापर वैद्यकीय अधिकाºयांच्या परवानगीने केला काय? रुग्णांशिवाय आणखी कोणत्या कामाकरिता या रुग्णवाहिकेचा वापर होतो, याची चौकशी करुन योग्य कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. त्यामुळे आता काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रुग्णवाहिकेचा कर्मचाऱ्यांकडून खासगी वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2019 12:05 AM
परिसरातील रुग्णांची ने-आण करण्याकरिता शासनाकडून येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. परंतु, कर्मचारी रुग्णवाहिकेचा वापर घरगुती कामासाठी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
ठळक मुद्देमांडगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकार