न.प.ची मोहीम: प्लास्टिक पिशव्या जप्त आर्वी : कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी आहे. परंतु, त्याचा व्यापाऱ्यांकरवी मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याची माहिती मिळाल्यावरून स्थानिक पालिका प्रशासनाने विशेष मोहीम राबवून अठरा व्यापाऱ्यांवर कार्यवाही करीत १५ किलो कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. पालिकेच्या प्लास्टिक प्रतिबंधक पथकाने नेहरू भाजीमार्केटमध्ये कारवाई करून १८ व्यापाऱ्यांकडून १५ किलोच्या प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. प्लास्टिक पिशव्यांमधून वस्तू विकणाऱ्यांना तसेच प्लास्टिक पिशव्याजवळ बाळगल्यास पहिल्यावेळी ५०० आणि दुसऱ्यावेळी १००० रूपयांचा दंड आकारण्यात येत आहे. पालिकेच्या पथकामार्फत शहरातील दुकाने व गोदामाची तपासणी करून प्लास्टिक पिशव्यांचा साठा आढळणाऱ्या व्यावसायिकांकडून दंड आकारण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी सांगितले. ही कार्यवाही रत्नमाला फटींग, निलेश रासेकर, सुनील आरीकर, महेंद्र पालिवाल, महेंद्र शिंगणे, अरूण पंड्या, शिवा चिमोटे, विक्की डुलगज, प्रफुल्ल तंबाखे आदींनी केली.(तालुका प्रतिनिधी)
आर्वीतील १८ व्यापाऱ्यांवर कार्यवाही
By admin | Published: April 05, 2017 12:45 AM