शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
6
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
7
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
8
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
9
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
13
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
14
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
15
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
16
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
17
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
18
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
19
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

मिरवणुकीत ध्वनी प्रदूषण

By admin | Published: April 16, 2017 12:56 AM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास मोठे स्पिकर लावून ...

१२ जणांवर गुन्हे वर्धा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास मोठे स्पिकर लावून ध्वनी पदूषण करणाऱ्या दोन मिरवणुकीवर कारवाई करण्यात आली. यात एकूण १२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. पोलीस सुत्रानुसार, १४ एप्रिलच्या रात्री ११ वाजताच्या दरम्यान आर्वी नाका येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मिरवणुकीत ट्रॅक्टर क्र. एम.एच ३२ पी १६५१ व ट्रॉली क्र. एम.एच. २९ सी ५६८२ मध्ये ध्वनीप्रदूषण यंत्रणा एकूण ६ स्पीकर बसविले. ध्वनी प्रदूषण तपासणी प्रक्षेपणाद्वारे ध्वनी तीव्रता मोजली असता ती १०८ डेसीबल इतकी आढळून आली. यावरून मिरवणुकीचे आयोजक विशाल भोयर, शैलेश थुल, राजेंद्र कातकर, मनोहर कांबळे, रवींद्र बावनकर, अमोल चाहांन्दे सर्व रा. नागसेन नगर यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. शास्त्री चौक परिसरात रॅली दरम्यान मिनीट्रक क्र. एम.एच. ०५ ४०४४ मध्ये ध्वनीप्रदूषण यंत्रणा एकूण ६ स्पीकर बसूवन १००.७ डेसीबल इतक्या तीव्र आवाजात गाणे वाजविल्याचे आढळून आले. यावरून अमित नाईक, अक्षय बागडे, साहील डोके, अक्षय सुटे, निलेश फुसाटे सर्व रा. सिंदी (मेघे) या पाच जणांसह अभिलाष संजय पवार रा. नागपूर याच्यावर रामनगर ठाण्यात भादंविच्या कलम ३३, १३४, १३६, सहकलम ३१ (अ), ३७ हवा प्रदूषण प्रतीबंधक कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.(प्रतिनिधी)