शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

सुरक्षित फवारणीसाठी अंगरक्षक कोटाची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 1:18 AM

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांकडून रासायनिक कीटकनाशकांचा अविवेकी वापर होत आहे. सतत फवारणीच्या कामामुळे मानवी शरीरावर दुष्परिणाम होत आहे. विदर्भात झालेल्या जीवितहानीमुळे सर्व शेतकºयांत एक भयावह वातावरण निर्माण झाले आहे. या हानीची दक्षता घेण्याकरिता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलांतर्गत येणाऱ्या सेलसुरा येथील कृषी विज्ञान केंद्राद्वारे गोणींपासून पोषाख तयार करण्यात आला.कृषी ...

ठळक मुद्देकृषी विज्ञान केंद्र सेलसूराची निर्मिती : बचत गटांमार्फत पोशाख उपलब्ध करून देण्याचा मानस

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांकडून रासायनिक कीटकनाशकांचा अविवेकी वापर होत आहे. सतत फवारणीच्या कामामुळे मानवी शरीरावर दुष्परिणाम होत आहे. विदर्भात झालेल्या जीवितहानीमुळे सर्व शेतकºयांत एक भयावह वातावरण निर्माण झाले आहे. या हानीची दक्षता घेण्याकरिता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलांतर्गत येणाऱ्या सेलसुरा येथील कृषी विज्ञान केंद्राद्वारे गोणींपासून पोषाख तयार करण्यात आला.कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा येथील गृहविज्ञान विषयतज्ञ प्रा. उज्वला सिरसाट यांनी वसंतराव नार्ईक मराठरावाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे अंगरक्षक कोटाची प्रात्यक्षिकासह माहिती घेतली. यानंतर अंगरक्षक कोट तयार केले आहेत. काही शेतमजूर सतत फवारणीची कामे करीत असल्याने त्यांच्यावर घातक परिणाम होत आहेत. सतत किटकनाशकाच्या संपर्कामुळे त्वचेची अ‍ॅलर्जी, खाज, सतत डोकेदुखी, अशक्तपणा, मळमळ, चक्कर येणे, दृष्टी कमी होणे आदी लक्षणे दिसून येतात. फवारणी कररताना द्रावण अंगावर, डोळ्यात व श्वासाद्वारे नाकात जाते. फवारणीच्या वेळी तंबाखू खाणे, विडी ओढणे, हात न धुता पाणी पिणे आदी प्रकार सर्रास आढळतात. यामुळे किटकनाशकांचे अंश पोटात जाऊन मृत्यूही ओढवू शकतो. ही जीवहानी होऊ नये या दृष्टीकोनातून सेलसुरा येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये किटकनाशक फवारणी अंगरक्षक कोट (कपडे) तयार केलेले आहे. यात बूट, हातमोजे, मास्क चेहरा झाकण्यासाठी प्लॉस्टिकचे आवरण, टोपी आदी घालून संरक्षित फवारणी करता येते. या पोशाखाला आतून सुती कापडाचे अस्तर लावलेले आहे. हा पोशाख घरीही तयार केला जाऊ शकतो. सुती कापडाचे अस्तर लावल्यास येणारा घाम सोशला जातो तथा कापडे असल्याने किटकनाशकाचे कण आत जाऊ शकणार नाही. याची किंमत सुमारे ३५० रुपयांपर्यंत जात असून बचत गटांमार्फत असे पोशाख अधिक प्रमाणात तयार करून शेतकºयांना ते स्वस्त दरात उपलब्ध केले जाऊ शकतात. यातून बचत गटांनाही रोजगार मिळेल आणि शेतकºयांनाही कमी खर्चात उपयोगी वस्तू प्राप्त होऊ शकेल. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या अंगरक्षक कोटाचे प्रात्याक्षिकही देण्यात आले आहे.हात पाण्याने स्वच्छ धुवावे, किटकनाशकाचा पर्यावरणाशी कमीत कमी संपर्क येईल याची काळजी घ्यावी. किटकनाशके फवारलेल्या शेतात इशारा फलक लावावा आदी काळजी घेण्याच्या सूचनाही कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रशांत उंबरकर यांनी दिल्या. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्र सेलसूरा येथे भेट देत अंगरक्षक कोटाची पाहणी करावी. किटकनाशक फवारताना घ्यावयाच्या काळजीबद्दल माहिती घ्यावी, असे आवाहन शास्त्रज्ञांनी केले आहे.कृषी यांत्रिकीकरणावर चर्चासत्र व यंत्राचे प्रात्यक्षिकआंजी (मो.)- येथील शेतकरी गट व चंद्रशेखर अ‍ॅग्रो इंजिनिअरींग सिंदी (रेल्वे) यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीकृष्ण गो-आश्रम येथे कृषी यांत्रिकीकरणावर चर्चासत्र व यंत्राचे प्रात्याक्षिक पार पडले. यावेळी गजानन ढुमणे, अनिल पाटील, प्रमोद भोयर मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. मान्यवरांनी शेतकऱ्यांना तांत्रिक शेती करण्यासाठी कृषी यंत्र, अवजारे चांगले वापरून कमी वेळेत जास्त कामे कशी करता येतील. खर्चही कमी लागेल व चांगले उत्पन्न होऊन बचत होईल, याबाबत मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रवीण खैरकार यांनी, संचालन हरिष राऊत यांनी केले तर आभार रणजीत ताकसांडे यांनी केले. कार्यक्रमाला प्रमोद भोमले, मनोहर शिंदे, बावणकर, हिंगे आदींनी सहकार्य केले.