शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

प्रतिबंधित बियाणे कायदा झुगारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 11:28 PM

लोकमत न्यूज नेटवर्क हिंगणघाट : जैविक, जनुकीय बियाण्यांवर पर्यावरण कायदा, बियाणे कायदा व जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत प्रतिबंध असतानाही हजारो ...

ठळक मुद्देशेतकरी संघटनेचे आंदोलन : शेगाव (कुंड) येथे शेतकऱ्यांनी केली कपाशीची लागवड

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : जैविक, जनुकीय बियाण्यांवर पर्यावरण कायदा, बियाणे कायदा व जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत प्रतिबंध असतानाही हजारो शेतकऱ्यांनी हा कायदा झुगारून शेगांव (कुंड) येथे कपाशी पिकाची लागवड केली. शेतकरी संघटनेच्या नेतृत्वातील या अनोख्या आंदोलनामध्ये सहभागी शेतकऱ्यांनी मधुसूदन हरणे यांच्या शेतात प्रतिबंधित अप्रमाणिीत एचटीबीटी कापूस बियाण्याची लागवड करून प्रशासनात खळबळ उडवून दिली आहे.देशात अस्तित्वात असलेल्या कायद्याने शेतकºयांचे निवडीचे स्वातंत्र्य हिरावले आहे. शेतकºयांनी त्यांच्या शेतात कोणते बियाणे वापरायचे हा अधिकार त्यांचा आहे. जगातील प्रगत देशांत नवनविन संशोधित जैविक व जनुकीय बियाण्यांचा वापर करीत आहे. त्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च कमी आणि उत्पादनात वाढ झाली आहे. बियाण्यांचा वापर असलेल्या देशातील आयात केलेले तेल, दाळ, मोहरी चालते; तर मग देशातील शेतकºयांना ते तंत्रज्ञान युक्त बियाणे वापरायला बंदी कां? असा प्रश्न उपस्थित करून आता ही तंत्रज्ञानाच्या स्वातंत्र्याची लढाई आहे.शेतीत तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय थांबायचे नाही. हे आंदोलन शेतकºयांनी गावागावात करावे, असे आवाहन शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, माजी आमदार सरोज काशिकर, राम नेवले, यांनी केले. यावेळी शैला देशपांडे, ललित बहाळे, युवा आघाडी अध्यक्ष सतीश दाणी, नंदू काळे, नंदू खेरडे, मदन कामडी, लक्ष्मीकांत कवूटकर, पांडुरंग भालशंकर, सुधीर सातपुते, मधुसूदन हरणे, जिल्हाप्रमुख उल्हास कोंटबकर, प्रा. मधुकरराव झोटिंग, सुभाष बोकडे यांची उपस्थिती होती. आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी हेमराज इखार, गणेश मुटे, सारंग दरणे, संजय चौधरी, राजू नगराळे, नामदेव मानकर, संदीप ठाकरे, सुधाकर अगडे, विजय धोटे, रोहित हरणे, प्रवीण भोयर, विजय किलनाके यांनी सहकार्य केले. आंदोलनस्थळाल कृषी अधिकाºयांनी भेट देऊन लागवड केलेले काही बियाणे जप्त केले. या आंदोलनादरम्यान पोलिसांचाही तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. तरिही मोठ्या जोशात शेतकºयांनी आंदोलन करुन शासनाच्या धोरणाला आव्हान दिले आहे.गावागावांत वेगवेगळ्या दिवशी करणार बियाण्यांची लागवडआजच्या शेगाव (कुंड) येथील या शेतकरी तंत्रज्ञान स्वातंत्र्य सत्याग्रह आंदोलनात पुरुषांसह महिलांची मोठी उपस्थिती होती. हे आंदोलन वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळ्या ठिकाणी सामूहिकपणे करणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. या आंदोलनात नागपूर, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील हजारो शेतकरी सहभागी झाले होते. सर्व मान्यवरांनी प्रत्येक जिल्ह्यातील आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. या आदोलनानंतर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आंदोलनामध्ये सहभागी शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले. या सभेचे संचालन मधुसूदन हरणे यांनी केले तर उपस्थितांचे आभार चंद्रमणी भगत यांनी मानले.राज्यात कापसाच्या एचटीबीटी बियाणे विक्री अनधिकृत असून लागवडीसाठी मनाई आहे. अशा स्थितीत शेतकरी संघटनेद्वारा शेगाव (कुंड) येथील मधुसूदन हरणे यांच्या शेतात कापसाच्या या प्रतिबंधित बियाण्याची केलेली लागवड कायदा मोडणारी आहे. घटनास्थळावरुन ५० ग्रॅम बियाणे ताब्यात घेण्यात आले. या बियाण्यांचा प्रयोगशाळेतून अहवाल प्राप्त झाल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात येणार आहे.राष्ट्रपाल मेश्राम, प्रभारी तालुका कृषी अधिकारी

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती