संभाजी ब्रिगेडचे जिल्हाधिकाऱ्यांचे निवेदन वर्धा : मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंबेडकर भवन व बुद्धभूषण प्रिटींग प्रेस पाडल्याचा संभाजी ब्रिगेडसह महाराष्ट्र अंनिसने शुक्रवारी निषेध नोंदविला. यात सहभागींना तात्काळ अटक करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. निवदेन देतेवेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मंगेश विधळे, मसेसंचे राजाभाऊ वानखेडे, सुधीर गिऱ्हे, सुधीर पांगूळ, डॉ. सिद्धार्थ बुटले, गजेंद्र सुरकार, डॉ. प्रशांत रोकडे, वैभव तळवेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. याच मागणीकरिता दि बुद्धीरूट सोसायटी आॅफ इंडियाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी २६१ स्वाक्षऱ्यांचे निवेदन शासनाला पाठविण्याकरिता ते निवासी जिल्हाधिकाऱ्याच्या सुपूर्द केले. यावेळी जिल्हाध्यक्ष रामदास बंसोड, सरचिटणीस मधुकर वानखेडे, कोषाध्यक्ष अभय मकेश्वर, ज्ञानेश्वर ताकसांडे, किशोर मस्के, आशा लोटे, निर्मला गुजर, मुरलीधर कांबळे, भोजराज धाबर्डे, उमा इंगोले, प्रियदर्शना भेले, कमल कांबळे, मीना मस्के, वृंदा वानखेडे, उषा गणवीर, शिला धाबर्डे, प्रतिभा थूल, सावित्री बागडे यांच्यासह सोसायटीचे सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आंबेडकर भवन, बुद्धभूषण प्रेस पाडल्याचा निषेध
By admin | Published: July 02, 2016 2:20 AM