काँग्रेसतर्फे सरकारच्या चतुर्थ वर्षपूर्तीचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 11:48 PM2018-10-31T23:48:52+5:302018-10-31T23:50:11+5:30
जिल्हा युवक काँग्रेसच्यावतीने बुधवारी भाजप सरकारच्या चतुर्थ वर्षपूर्तीचा निषेध करण्यात आला. विडंबनात्मक योगा करुन सरकारच्या कारभाराची धिंड यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी काढली. या आंदोलनाचे नेतृत्व युवक काँग्रेसचे गौरव देशमुख यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्हा युवक काँग्रेसच्यावतीने बुधवारी भाजप सरकारच्या चतुर्थ वर्षपूर्तीचा निषेध करण्यात आला. विडंबनात्मक योगा करुन सरकारच्या कारभाराची धिंड यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी काढली. या आंदोलनाचे नेतृत्व युवक काँग्रेसचे गौरव देशमुख यांनी केले.
भारतीय जनता पार्टीने निवडणुकीच्या काळात नागरिकांना मोठाले आश्वासन दिले होते. शिवाय तरुण, महिला, शेतकरी, कष्टकरी, व्यापारी आदींनाही अच्छे दिनाचे स्वप्न दाखविले. परंतु, तीन वर्षांपासून सत्ता भोगणाऱ्या भाजपाच्या कार्यकाळात महागाई चांगलीच वाढली आहे. शिवाय इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. इतकेच नव्हे तर आता भाजपाचे पदाधिकारी ती आश्वासने चुनावी मुद्दा होता असे सांगतात. भाजपाच्या या दुर्लक्षी धोरणांचा या आंदोलनाच्या माध्यमातून निषेध करण्यात आला.
संभाव्य जलसंकट लक्षात घेवून वर्धा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा. मोदी सरकारचा नोटबंदीचा निर्णय फसला असून भारतीय अर्थव्यवस्थेला गतीमान करण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यात याव्या. होतकरू तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. सरकारने शेतकरी हितार्थ निर्णय घ्यावे आदी मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून रेटण्यात आल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या निषेध आंदोलनात नितीन इंगळे, आबिद शेख, कुणाल भाकरे, वैभव तेलरांधे, पल्लवी खामणकर, मंगेश काळे, आदित्य खुणकर, प्रतीक राऊत, विनय धवने, मयुर नवघरे, राहूल मेहेर, निखिल देशमुख, रवी कडू, चेतन कडू, प्रसाद मुरडीव, साक्षील खुणकर, आदित्य ठाकरे, गौरव काखे, सुयोग खंडारे, विपीन सोनोने, मेहुल खाडे, अमन ढुमणे, आदेश चिवाने, वैभव राऊत, हिमांशु राऊत, कोहड, मेहुल खाडे, संकेत कार्लेकर, सौरभ बिडवाईक यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले.