लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांनी खरेदी केलेले एका नामांकित कंपनीचे सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली. कृषी विभागही त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करून प्रहारच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय गाठून येथील अधिकाऱ्यांना बेशरमाचे झाड देत शासनाच्या दुर्लक्षित धोरणाचा निषेध नोंदविला. शिवाय सदर कंपनीवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी अधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनातून केली आहे.जून महिन्यात अखेरच्या दोन दिवसात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पैशाची जुळवाजुळव करून बियाण्यांची तातडीने खरेदी केली. परंतु, एका नामांकित कंपनीचे सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे शेतकºयांची फसवणूकच या कंपनीने केल्याने त्या कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी निवेदन देऊन कृषी विभागाकडे केली होती. परंतु, त्या निवेदनाला केराची टोपलीच दाखविण्यात आली. कृषी विभागाकडून सध्या शेतकरी विरोधी धोरण राबविले जात असल्याचा आरोप करीत सुरुवातीला प्रहारच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयात अर्धातास ठिय्या आंदोलन केले. तर त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन आणि सोबत आणलेले बेशरमाचे झाड सहायक प्रशासन अधिकारी उमेश गजभिये व कृषी अधिकारी गजानन भोयर यांना देऊन आपला रोष व्यक्त केला. कृषी विभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने २५ हजारांची आर्थिक मदत करावी, तसेच सदर नामांकीत कंपनीविरुद्ध फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. येत्या आठ दिवसांत या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. या आंदोलनाचे नेतृत्त्व प्रहारचे जिल्हा प्रमुख विकास दांडगे, रसुलाबादचे सरपंच राजेश सावरकर यांनी केले. आंदोलनात शेतकरी व प्रहारचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
बेशरमचे झाड देऊन नोंदविला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 10:40 PM
लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शेतकऱ्यांनी खरेदी केलेले एका नामांकित कंपनीचे सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर ...
ठळक मुद्देप्रहारचे आंदोलन : ‘त्या’ कंपनीवर कठोर कारवाईची मागणी