शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

आर्वीत चिनी वस्तूंची होळी करून नोंदविला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 11:27 PM

चीनच्या दंडूकेशाही धोरणांना प्रत्यूत्तर देण्याकरिता स्थानिक गांधी चौकात चिनी वस्तंूची होळी करून निषेध नोंदविण्यात आला.

ठळक मुद्देराष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा अभियानचा उपक्रम : माजी खासदार-आमदारांसह शेकडो नागरिकांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : चीनच्या दंडूकेशाही धोरणांना प्रत्यूत्तर देण्याकरिता स्थानिक गांधी चौकात चिनी वस्तंूची होळी करून निषेध नोंदविण्यात आला. या आंदोलनात शेकडो महिला-पुरूषांसह विद्यार्थी सहभागी झाले होते.या आंदोलनाचे नेतृत्त्व माजी खासदार विजय मुडे, माजी आमदार दादाराव केचे, मदत फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल जोशी, अस्थीरोग तज्ज्ञ डॉ. रिप्पल राणे, नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे, राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा अभियान समितीचे अध्यक्ष अविनाश पंचगडे यांनी केले.अनिल जोशी यांनी मार्गदर्शन करताना भारताच्या सीमा काबीज करण्यासाठी चीन प्रयत्न करीत आहे. दिवसेंदिवस चीनची दादागिरी वाढत आहे. चीन दोन्ही देशांच्या सिमेवर सैन्य पाठवून खुरापती कारवाया करीत आहे. त्याला प्रती उत्तर देण्यासाठी नागरिकांनी चिनी बनावटीच्या वस्तूची खरेदी करण्याला फाटा देत स्वदेशी वस्तूंची खरेदी करावी, असे आवाहन केले.चिनी वस्तूंचा वापर करणे हे देश हिताचे नसून भारतीय बनावटीच्या मालाला प्रथम प्राधान्य देणे म्हणजेच देशहिताचे कार्य ठरणार आहे, असे याप्रसंगी नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे यांनी सांगितले.स्वदेशी वस्तूंची खरेदी नागरिकांनी केल्यास देशातील बेरोजगारांना जास्तीत जास्त रोजगाराची संधी उपलब्ध होईल. त्यातूनच वाढत्या बेरोजगारीला आळा बसेल असेही त्यांनी सांगितले.आंदोलनात राजाभाऊ गिरधर, दशरथ जाधव, सुनील पारसे, डॉ. विनय देशपांडे, सुशिलसिंह ठाकूर, विनय डोळे, पप्पू जोशी, नगरसेवक रामू राठी, जगण गाठे, कैलाश गळहाट, कमल कुलधरीया, श्याम काळे, परवेज साबीर, सतीश शिरभाते, सूर्यप्रकाश भट्टड, राजेश गुल्हाणे आदी सहभागी झाले होते. याप्रसंगी कन्नमवार विद्यालय, गांधी विद्यालय, मॉडेल हायस्कूल, विद्या निकेतन स्कूल, तपस्या स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तथा शहरातील नागरिकांनी आपआपल्या घरातील चिनी बनावटीच्या वस्तू आणून त्याची होळी करून आपला रोष व्यक्त केला. तसेच केंद्र सरकारने चीनच्या विषयी कठोर भुमीका घ्यावी, अशी मागणी लावून धरली. कार्यक्रमाचे संचालन वसंत उपाध्ये यांनी केले तर दशरथ जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.सदर आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी मिलिंद हिवाळे, सुरेंद्र पारसे, हर्षल देशमुख, अभय हळवे, अजय कमकवार, हर्ष पांडे, गोपाल गहलोत, सागर निर्मळ, डवरे, मयूर पोकळे, अमोल घोटकर, संजय देशपांडे, नंदु वैद्य, अमोल मधुळकर, पायतोडे यांच्यासह विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.