शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
3
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
4
"अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
5
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
6
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
7
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
8
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
9
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
10
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
11
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
12
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
13
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
14
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
15
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
16
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
17
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
18
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
19
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
20
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं

डिजिटल पेमेंटकरिता ‘प्रॉम्प्ट पेमेंट‘

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 12:11 AM

महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाने स्पष्ट केल्यानुसार, जे ग्राहक पॉवर फॅक्टर सवलतीचा योग्य वापर करतील, अशा ग्राहकांना त्यासाठी आकारलेल्या रकमेचा परतावा महावितरणकडून करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देपॉवर फॅक्टर सवलत : ग्राहकांना होईल रकमेचा परतावा

पुरू षोत्तम नागपुरे।लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाने स्पष्ट केल्यानुसार, जे ग्राहक पॉवर फॅक्टर सवलतीचा योग्य वापर करतील, अशा ग्राहकांना त्यासाठी आकारलेल्या रकमेचा परतावा महावितरणकडून करण्यात येणार आहे. तसेच डिजिटल पेमेंटची सवलत मिळण्यासाठी लघुदाब ग्राहकांना विजबिलाचा भरणा निर्धारित वेळेत करणे व थकबाकी निरंक असणे अनिवार्य आहे.याशिवाय सर्व ग्राहकांना करार मागणीच्या पातळीची मर्यादा कायम राखणे क्रमप्राप्त आहे. आयोगाने दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने महावितरणने याबाबत निर्णय घेतले आहे. महावितरणच्या मध्यावधी वीज दर आढावा याचिकेवर १२ सप्टेंबर २०१८ रोजी आदेश दिला होता, या आदेशाची अंमलबजावणी १ सप्टेबर २०१८ पासून करण्यात आली आहे. या आदेशाच्या अनुषंगाने महावितरण कंपनी तसेच विविध ग्राहक व ग्राहक संघटनांनी आयोगाकडे पुनर्विचार याचिका दाखल केल्या होत्या. यात लोड फॅक्टर इन्सेटिव्हच्या सूत्रात सुधारणा, लघुदाब ग्राहकांकरिता डिजिटल पेमेंटची अंमलबजावणी प्रॉम्ट पेमेंटच्या धर्तीवर करणे व करार मागणीची पातळी वर्षात तीनवेळा ओलांडल्यास संबंधित ग्राहकाच्या करार मागणीमध्ये सुधारणा करणे तसेच पॉवर फॅक्टरसंबंधित बदल अंतर्भूत होता. आयोगाच्या सुधारित आदेशामुळे डिजिटल पेमेंटच्या इन्सेटिव्हचा लाभ मिळण्याकरिता संबंधित लघुदाब ग्राहकांनी आपल्या वीजबिलाचा भरणा प्रॉम्ट पेमेंट डिस्काऊंटच्या वेळेत डिजिटल माध्यमाद्वारे करणे आवश्यक आहे. तसेच हा लाभ प्राप्त करण्याकरिता संबंधित ग्राहकांची थकबाकी निरंक असणे आवश्यक आहे. विद्युतप्रणाली सक्षम राखण्याच्या अनुषंगाने आयोगाच्या विनिमय २००५ विद्युत पुरवठा संहिता आणि पुरवठ्याच्या इतर अटीअन्वये करार मागणीची पातळी राखण्यासाठी व तीनवेळेची निर्धारित मर्यादा ओलांडणाऱ्या ग्राहकांना शिस्त लावण्याकरिता महावितरण कंपनीद्वारे त्यांची करार मागणी पुर्नस्थापित करण्यात येईल, अशी विनियमात सुधारणा केलेली आहे. परिणामी, सर्व ग्राहकांना करार मागणीच्या पातळीची मर्यादा कायम राखणे आवश्यक आहे. या सुधारित आदेशाची अंमलबजावणी १ जानेवारी २०१९ पासून करण्यात आली आहे. आयोगाच्या २ जानेवारी २०१९ रोजीच्या पॉवर फॅक्टर संबंधातील आदेशात यापूर्वी दिलेल्या १२ सप्टेंबरच्या वीजदर आदेशातील सरासरी पॉवर फॅक्टरच्या गणनेत लिडरीक्टीव्ह पॉवरमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तसेच पॉवर फॅक्टर सवलत व दंडाच्या टक्केवारीमध्येही कुठलाही बदल आयोगाने केलेला नाही. तसेच पॉवर फॅक्टर सवलत व दंडाच्या टक्केवारीमध्येही कुठलाही बदल आयोगाने केलेला नाही. परंतु, विद्युत प्रणालीत सुधारणा व्हाव्यात व त्या करण्यासाठी ग्राहकांना आवश्यक ते बदल करता यावेत व ग्राहकांना योग्य तो पॉवर फॅक्टर राखता यावा, ग्राहकांना त्यांच्या प्रणालीत सुधारणा करण्यासाठी वेळ मिळावा आदी बाबींचा सर्वांगीण विचार करून पॉवर फॅक्टर अनुज्ञेय मर्यादेत राखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याकरिता ग्राहकांना ३१ मार्च २०१९ पर्यंतचा वेळ देण्यात आला आहे.

टॅग्स :digitalडिजिटल