सुविधांचा आढावा : जिल्हा दक्षता समितीची बैठकवर्धा : शासनाच्या गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र अधिनियमांतर्गत जिल्हा दक्षता समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात घेण्यात आली. यावेळी पीसीपीएनडीटी अंतर्गत सर्व योजनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले. अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी दुर्योधन चव्हाण, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. अजय डबले, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन निमोदिया उपस्थित होते. बैठकीमध्ये पीसीपीएनडीटी अंतर्गत जिल्ह्यातील सर्व समुचित प्राधिकरण, आॅनलाईन फार्म एफ कसा भरावा, टोल फ्री क्रमांक, आमची मुलगी डॉट कॉम संकेतस्थळ तसेच इतर माध्यमातून प्राप्त झालेल्या तक्रारीवर करण्यात आलेली कार्यवाही, स्त्रीभ्रूण हत्या टाळण्याच्या अनुषंगाने सामाजिक संंस्थांच्या सहभागाने प्रबोधनात्मक जनजागृती कार्यक्रम राबविणे, जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील सोनोग्राफी केंद्र, एमटीपी केंद्राची नोंदणी, नूतनीकरण आदींचा आढावा घेतला आला व सर्व योजनांची योग्य रित्या अंमलबजावणी करण्याच्या संबंधितांना सूचना केल्या. विधी समुपदेशक अॅड. कांचन बडवाने यांनी माहिती दिली.(शहर प्रतिनिधी)
पीसीपीएनडीटी अंतर्गत सर्व योजनांची योग्य अंमलबजावणी करा
By admin | Published: July 16, 2015 12:06 AM