लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ‘पैसा आणि संपत्ती’ या दोन गोष्टी रक्ताच्या नात्यांनाच नाही तर जन्मदात्यांनाही विसरायला भाग पाडतात. अशीच काहीशी परिस्थिती सध्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गामुळे निर्माण झाली आहे. तीन तालुक्यातील शेतजमिनी या महामार्गाकरिता अधिग्रहीत करण्यात आल्या असून शासनाकडून भरमसाठ मोबदलाही देण्यात आला. ही रक्कम पाहून भल्याभल्यांच्या भुवया उंचावल्या आणि उभ्या आयुष्यात शेताचा धुराही न पाहणाऱ्यांनी केवळ पैशाच्या हव्यासापोटी मी ही या जमिनीचा वारसदार असा कांगावा सुरू केला. परिणामी, घरांमध्ये वाद सुरू होऊन हा वाद चार भिंतींच्या कक्षा ओलांडून थेट न्यायालयात पोहोचला.वर्धा जिल्ह्यातील सेलू, वर्धा आणि आर्वी या तीन तालुक्यातील ३४ गावांमधून ६०.७३ किलोमीटरचा नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग गेला आहे. या महामार्गाकरिता या तिन्ही तालुक्यातील ६०२.९३ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले असून शेतकऱ्यांना सरळ खरेदीतून ३७९.८८ कोटींचा मोबदलाही दिला आहे. या महामार्गाचे काम प्रगतीपथावर असून तिन्ही तालुक्यातील शेतकºयांकडे ‘समृद्धी’ आली असतानाही अनेकांच्या घरामध्ये याच ‘समृद्धी’मुळे वाद उफाळून आले आहेत. नोकरी लागल्यानंतर किंवा गाव सोडल्यानंतर नुकसानीचा धंदा म्हणून अनेकांनी शेतीकडे दुर्लक्ष केले.भावंडं, वडील किंवा नातेवाईकांकडे शेतीची जबाबदारी सोपवून मोकळे झाले. ज्यांनी जबाबदारी स्वीकारली, त्यांनी अनेक उन्हाळे-पावसाळे शेतीच्या मशागतीसाठी घालवून शेती सुपीक ठेवली.बºयाचदा त्यांना निसर्गकोपाचाही फटका सहन करावा लागला. मात्र, समृद्धी महामार्गाचा कोट्यवधीचा मोबदला पाहून सारेच तुटून पडले. उभ्या आयुष्यात शेतीचा गंध नसणाऱ्यांनी आता हिस्से वाटपासाठी दंड थोपटले आहे. मीही या जमिनीचा वारसदार असल्याने मलाही मोबदला हवा आहे, असे वाद काही घरांमध्ये निर्माण झाले आहे. काही हातघाईवर आले तर काहींनी पोलीस ठाण्याचीही पायरी चढली.इतकेच नव्हे, तर आर्वी, वर्धा व सेलू या तिन्ही तालुक्यातील २८ जणांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत मोबदल्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.महामार्गामुळे शेतकरी झाले सजगनागपूर-मुंबई समृद्धी महामार्गामुळे अनेकांना ताळ्यावर आणले आहे. एकाच परिवारातील व्यक्तींनी शेताचे विभाजन न करता पूर्वापार चालत आलेल्या पद्धतीनुसारच आतापर्यंत शेती केली आहे. त्यामुळे शेताची वहिवाट एकाकडे असतानाही सातबाºयावर मात्र अनेकांची नावे आहेत. परिणामी, समृद्धी महामार्गाच्या मिळालेल्या मोबदल्याला सर्वच वारसदार ठरले. अनेकांनी हा वारसाहक्क घेण्यासाठी हात पुढे केल्याने नात्यांमध्ये दुरावा निर्माण व्हायला लागला. इतकेच नव्हे, तर एका कुळातील असल्याने सातबाºयावर नाव नसतानाही मी ही या जमिनीचा वारसदार आहे, असा कांगावा करीत आडकाठी आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यामुळे आता वेळीच आपल्या हिस्साची शेती वेगळी करून वहिवाट करण्याचा निर्णय बहुतांश शेतकºयांनी घेतला आहे.
जिल्ह्यात ‘समृद्धी’ अन् घरांमध्ये ‘वादावादी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 6:00 AM
वर्धा जिल्ह्यातील सेलू, वर्धा आणि आर्वी या तीन तालुक्यातील ३४ गावांमधून ६०.७३ किलोमीटरचा नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग गेला आहे. या महामार्गाकरिता या तिन्ही तालुक्यातील ६०२.९३ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले असून शेतकऱ्यांना सरळ खरेदीतून ३७९.८८ कोटींचा मोबदलाही दिला आहे. या महामार्गाचे काम प्रगतीपथावर असून तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांकडे ‘समृद्धी’ आली असतानाही अनेकांच्या घरामध्ये याच ‘समृद्धी’मुळे वाद उफाळून आले आहेत.
ठळक मुद्देतीन तालुक्यांमधून गेला महामार्ग : न्यायालयात २७ जणांचे वाद