लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : समृद्धी महामार्गाचे बांधकाम पूर्णत्त्वास नेणाऱ्या अॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने उपकंत्राटदाराला हाताशी घेऊन वनजमिनीसह शासकीय जमिनीवर उत्खनन करून मुरूमाची उचल केली. या उत्खननादरम्यान ३० वर्षांची तब्बल ५० हजार २२५ डेरेदार झाड भूईसपाट केली आहे. उल्लेखनीय म्हणजे साधे एक झाड विना परवानगी कापणाऱ्या शेतकऱ्यांवर वनगुन्हा दाखल केला जातो. पण अद्यापही अॅफकॉन्स कंपनीसह त्याच्या उपकंत्राटदारावर वृक्षकत्तलीबाबतचा साधा वनगुन्हा नोंदविण्यात आलेला नाही. त्यामुळे सध्या हे प्रकरण वृक्षपे्रमींसाठी संशोधनाचा विषय ठरत आहे.पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षलागवड मोहीम राबविणारी शासकीय यंत्रणा या प्रकरणात गप्प बसली आहे. वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील मौजा इटाळा (ग्रा.:पं.महाबळा) येथील शेत सर्व्हे नंबर ७ आराजी ३८.३९ हे. आर. मध्ये सामाजिक वनीकरण विभागाने १९८८ ला ३४४०० रोपटे लावली. त्याचे तीन वर्षे संगोपण करून जगलेली ७७ टक्के म्हणजे २६ हजार ६८२ झाडे नियमानुसार महाबळा ग्रामपंचातीला ४ जून १९९१ ला संवर्धनासाठी हस्तांतरीत केली. तसेच मौजा कोटंबा येथील शेत स. न. २१० (सरकारी जमीन) आराजी ११.१२ हे. आर. तसेच स. न. २०६ (वनविभाग महाराष्ट्र शासन) आराजी ४.६८ हे.आर. या जमीनीवर सन १९८९ ला सागवनासह इतर प्रजातींचे मौल्यवान १५ हजार २०० रोपे लावली. तिचे सामाजिक वनीकरणने संगोपन करून तीन वर्षानंतर जीवंत राहिलेली १० हजार ८७६ (७१.०५ टक्के) झाडे ग्रा.पं. कोटंबाला १९ फेबु्रवारी १९९२ ला हस्तांतरीत केली. पण सदर वृक्ष कमी मेहनतीत जादा मुनाफा कमविण्याच्या लोभात आणि समृद्धी महामार्गाचे काम पूर्णत्त्वास नेणाऱ्या अॅफकॉन्स कंपनीने पर्यावरणाचा ºहास करण्याचा विडा उललल्यागत केलेल्या उत्खननादरम्यान जमिनदोस्त करण्यात आली आहे. मौजा कोटंबा येथील शेत स.न. २९३/१ व २९३/२ (वनविभाग महाराष्ट्र शासन) या जमिनीतही विना परवानगी उत्खनन झाल्याची विश्वसनीय माहिती आहे.
समृद्धी महामार्ग; ग्रामपंचायतीला हस्तांतरील केलेल्या जमिनीवरील ५० हजार झाडे भुईसपाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 3:14 PM
समृद्धी महामार्गाचे बांधकाम पूर्णत्त्वास नेणाऱ्या अॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने उपकंत्राटदाराला हाताशी घेऊन वनजमिनीसह शासकीय जमिनीवर उत्खनन करून मुरूमाची उचल केली.
ठळक मुद्देअॅफकॉन्सचा प्रताप मनमर्जीने केले रोपवनात उत्खनन