लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नागपूर-मुंबई दरम्यान ७०० कि.मी. लांबीचा राज्य समृद्धी महामार्ग तयार करण्यात येत आहे. तो राज्यातील दहा जिल्ह्यांना जोडणारा आहे. तर प्रत्यक्ष १४ जिल्ह्याला या महामार्गाचा फायदा होणार आहे. त्यामुळे हा समृद्धी महामार्ग राज्याच्या प्रगतीसाठी महत्वाकांक्षीच प्रकल्प ठरणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सा.उ.) एकनाथ शिंदे यांनी केले.सेलू तालुक्यातील धानोली (मेघे) येथून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पॅकेज क्र.२ च्या सुरू असलेल्या कामाची पाहणी ना. शिंदे यांनी केली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अभियंता महाजन, उपअभियंता आश्विनी घुगे, होळकर, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे उपजिल्हाधिकारी निशिकांत सुके, जिल्हा समन्वयक प्रशांत दळवळकर, व्यवस्थापकिय संचालक गायकवाड, दिलीप बिल्डकॉन कंपनीचे संचालक गुप्ता, अनिलकुमार, प्रकाश झा व सेलूचे तहसीलदार महेंद्र सोनवणे यांची उपस्थिती होती. विकसीत महाराष्ट्रात मोलाचा वाटा देणाºया समृद्धी महार्गाचे काम एकूण १६ टप्प्यात करण्यात येत आहे. पॅकेज क्रमांक दोन मध्ये वर्धा जिल्ह्याचा समावेश आहे. यामध्ये ५८ कि.मी. लांबीचा महामार्ग जिल्ह्यातील तीन तालुक्यातून जाणार आहे. नागपूर ते मुबंई १२ तासाचे अंतर समृद्धी महामार्गामुळे ७ ते ८ तासात पूर्ण करता येणार आहे. नागरिकांसाठी तसेच विदर्भातील उद्योगांना बाजापेठेसाठी हा महामार्ग महत्वाकांक्षी ठरणार आहे. तसेच देशाच्या विकासात मोठी भर पडेल. डिसेंबर २०२० पर्यंत या महामार्गाचे काम पूर्ण करण्यात येईल, असेही यावेळी ना. शिंदे यांनी सांगितले.
प्रगतीसाठी समृद्धी महामार्ग महत्त्वाकांक्षीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2019 10:07 PM
नागपूर-मुंबई दरम्यान ७०० कि.मी. लांबीचा राज्य समृद्धी महामार्ग तयार करण्यात येत आहे. तो राज्यातील दहा जिल्ह्यांना जोडणारा आहे. तर प्रत्यक्ष १४ जिल्ह्याला या महामार्गाचा फायदा होणार आहे. त्यामुळे हा समृद्धी महामार्ग राज्याच्या प्रगतीसाठी महत्वाकांक्षीच प्रकल्प ठरणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सा.उ.) एकनाथ शिंदे यांनी केले.
ठळक मुद्देएकनाथ शिंदे । प्रगतिपथावरील कामाची केली पाहणी