लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अवकाळी पाऊस व गारपिटामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शेतमालाची नुकसान भरपाई व पडझड झालेल्या घरांच्या मालकांना त्वरीत आर्थिक मदत करण्यात यावी. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी शिवसनेच्यावतीने करण्यात आली आहे. तसे निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले आहे.गत तीन दिवसांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिवाय काही ठिकाणी झोपड्यांवरील टिनपत्रे उडाल्याने नागरिकांचे कुटुंबच उघड्यावर आले आहे. कृषी विभाग व महसूल विभागाला झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून सर्वेक्षणाचे काम सुरू असून सर्वेक्षणाची कामे झटपट पूर्ण करीत नुकसानग्रस्तांना शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. पवनार परिसरातील गणेश पाटील, झिबल हजारे, अरूण बोकडे, शंकर हिवरे, मंगेश हिवरे, योगराज वानखेडे यांच्या शेतमालाचे नुकसान झाले असताना अद्याप शासकीय यंत्रणेमार्फत पाहणी झाली नाही. नुकसानग्रस्तांना हेक्टरी ५० हजार रूपये शासकीय मदत देण्यात यावी. शिवाय ज्यांच्या घरांची पडझड झाली त्यांना २५ हजार रूपयांची मदत देण्यात यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजेश सराफ, तालुका प्रमुख गणेश इखार, शहर प्रमुख विशाल वैरागडे, युवा सेनेचे तालुका प्रमुख मयुर जोशी, माजी उपजिल्हा प्रमुख किशोर बोकडे, दिलीप भुजाडे, विशाल व्यास, कुणाल मोरे, संगीता खोडे, बाळा साठोणे, राजू साठोणे, दिलीप धामणकर, गजानन ढबाले, रोहित खोडे आदींची उपस्थिती होती.मदत देऊन दिलासा द्या - शे.स्वा.क्रां. कृती समितीवर्धा- बोंडअळीच्या संकटाने कापसाचे पीक पूर्णत: गेले असताना अवकाळी पाऊस व गारपिटाने तूर, चणा, गहू, मका व फळभाजी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याची गंभीर दखल घेवून शासनाने गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी स्वातंत्र्य क्रांती कृती समितीने जिल्हाधिकाºयांकडे निवेदनातून केली आहे. निवेदन देताना समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर किनकर, शरद कांबळे, अनिल भलमे, मोहन लांडगे, अनूप उघडे, मुकूंद गावंडे, रामभाऊ झिंगे, महादेव वाघमारे आदींची उपस्थिती होती. हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकºयांना एकरी ३० हजार रूपये शासकीय मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.नुकसानग्रस्त शेताची पाहणी करा - शेतकरी संघटनेची मागणीचिकणी (जामणी) - गारपीट व अवकाळी पावसामुळे देवळी तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अजूनही अनेक नुकसानग्रस्त भागांची कृषी वा महसूल विभागाने पाहणी केली नाही. झालेल्या नुकसानीची पाहणी करून सरकारने नुकसानग्रस्तांना भरीव मदत करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. शेताची पाहणी करते वेळी अधिकाºयांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन पाहणी करावी. यामुळे झालेल्या नुकसानाची खरी माहिती मिळेल. शिवाय नुकसानग्रस्त एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे राज्यध्यक्ष सतीश दाणी यांनी केली आहे.
हेक्टरी ५० हजारांची नुकसाई भरपाई द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 10:38 PM
अवकाळी पाऊस व गारपिटामुळे नुकसान झालेल्या शेतकºयांना शेतमालाची नुकसान भरपाई व पडझड झालेल्या घरांच्या मालकांना त्वरीत आर्थिक मदत करण्यात यावी.
ठळक मुद्देशिवसेनेची मागणी : तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदनातून साकडे