लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : जामणी येथील मानस अॅग्रो इंडस्ट्रीजकडून ऊसाची उशिरा तोड केली जात असल्याने उभ्या पिकाची वन्यप्राणी नासाडी करीत आहे. परिणामी, उत्पादनात घट होत असल्याने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी रेहकी शिवारातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे.रेहकी शिवारात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड करण्यात आलेली आहे. परंतु, करारानुसार संबंधितांकडून ऊसतोड करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे शेतात उभ्या असलेल्या उसाच्या वजनात मोठ्या प्रमाणावर घट होत आहे. यामुळेच मिळणाऱ्या मोबदल्यातही घट होत आहे. उसाची तोड निर्धारित वेळेत झाली तर दुसरे उत्पादनही घेता येते, परंतु त्यातही नुकसान होत आहे. तसेच शेतात उभ्या असलेल्या ऊस पिकाला जंगली जनावरांपासून भयंकर त्रास असून तेसुद्धा पिकाला नुकसान पोहचवित आहे.दुहेरी नुकसानामुळे शेतकºयांचे कंबरडे मोडले असून वनविभागाकडून व साखर कारखान्याकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.निवेदनावर सुरेश लाडे, फुलचंद झाडे, दामोदर झाडे, संजय घुमडे, गणेश झाडे, अशोक रघाटाटे, रवींद्र शिंदे, राजू पोहणे, देवराव हुडे, नामदेव शिंदे, श्रीकांत धानकुटे, सुरेश झाडे, संजय रघाटाटे, पुरुषोत्तम घुमडे, रवींद्र सावरकर, भास्कर मुजबैले यांच्यासह परिसरातील शेकडो शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत.रेहकीत नुकसानीचे सर्वेक्षणशेतपिक नुकसानीच्या प्रकरणाला प्राथमिकता दिली जाते, कार्यालयात एकही प्रकरण प्रलंबित नाही, अर्ज आल्याबरोबर प्रकरणावर त्वरित कारवाई करण्यात येते. आज पासूनच रेहकी शिवारात शेतपिक नुकसानाचे सर्व्हे सुरू करण्यात आले आहेत. जंगली जनावरांनी नुकसान केल्याचे आढळून आल्यास त्या शेतकऱ्यास शासन नियमाप्रमाणे तातडीने भरपाई देण्यात येईल, असे झडशी सहवन क्षेत्राचे क्षेत्राधिकारी कमलाकर वाटकर यांनी सांगितले.
वन्यप्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 12:46 AM
जामणी येथील मानस अॅग्रो इंडस्ट्रीजकडून ऊसाची उशिरा तोड केली जात असल्याने उभ्या पिकाची वन्यप्राणी नासाडी करीत आहे. परिणामी, उत्पादनात घट होत असल्याने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी रेहकी शिवारातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे.
ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन