लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : खरिपातील सोयाबीन पिकाला सततचा पाऊस या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे. खरे पाहता सर्वेक्षण करण्याचीही गरज नाही. सर्वच शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक प्रभावित झाले आहे. अशावेळी विमा कंपन्यांनी ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचा विमा हप्ता भरला आहे, त्यांना कंपनीकरवी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई त्वरित मिळावी, अशी सोयाबीन उत्पादकांची मागणी आहे.अतिपावसामुळे कमी दिवसात येणाऱ्या सोयाबीनला अंकुर फुटून त्याचे मोठे नुकसान झाले. मधात चार-पाच दिवस उघाड होती. त्या कालावधीत ज्यांना सवंगणी व मळणी करणे शक्य झाले, त्यांना एकरी अर्धा पोते ते दोन पोत्यांची आराजी लागली. आता १ ऑक्टोबरपासून येत असलेल्या सततच्या पावसामुळे काहींनी कापणी करून ढीग लावले. त्यांचे ढीग ओलाव्याने खराब होत आहे. ज्यांना ढीग करणे शक्य झाले नाही, त्याचे सोयाबीन शेतात ओले होत आहे. तर ज्यांनी सवंगणी केली नाही, त्या झाडांवरील शेंगांना अंकुर फुटत आहे.अनेकांनी कापणी न करता शेतात जनावरे सोडली. अनेक शेतकरी उघाड पडल्याबरोबर शेतात रोटावेटर फिरवून सोयाबीनची उभी झाडे जमिनीत गाडण्याच्या विचारात आहेत. एकंदरीत सर्वेक्षण करून नुकसानीचा अंदाज घेण्याची काहीच गरज नाही. सर्वच शेतातील सोयाबीनची अवस्था पेरले एक पोते, झाले अर्धा पोते तर खर्च एकरी १० ते १५ हजार. उत्पन्न मात्र शून्य रूपये अशी आहे. म्हणून पीक विमा कंपन्यांनी ही नैसर्गिक आपत्ती लक्षात घेऊन सोयाबीन उत्पादकांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे. तसेच पीक विमा वाढण्यास शेतकऱ्यांना प्रवृत्त करण्यासाठी कंपन्यांची वकिली करणाऱ्या महसूल विभाग, कृषी विभाग व बँकांच्या प्रशासनाने याकामी शेतकऱ्यांचे वकीलपत्र स्वीकारत पुढाकार घेऊन भरपाई देण्यास कंपनी प्रशासनाला बाध्य करावे, अशी भावना जाणकार शेतकरी व्यक्त करीत आहेत. नैसर्गिकचार एकरात सोयाबीन पेरले. सर्व काळजी घेऊन पीक तयार केले. पीकही चांगले आले. पावसाने थोडी उसंत देताच प्रतिएकर दोन हजार रुपये मजुरीने सवंगणी केली. शेतातील लहान-लहान ढीग उचलण्याआधीच सतत पाऊस येत असल्याने शेतांतील ढीग पूर्ण सडले असून पीक खराब झाले आहे.- प्रशांत गलाट, शेतकरी, दिघी (हिवरा).
शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसानभरपाई तातडीने द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 5:00 AM
अतिपावसामुळे कमी दिवसात येणाऱ्या सोयाबीनला अंकुर फुटून त्याचे मोठे नुकसान झाले. मधात चार-पाच दिवस उघाड होती. त्या कालावधीत ज्यांना सवंगणी व मळणी करणे शक्य झाले, त्यांना एकरी अर्धा पोते ते दोन पोत्यांची आराजी लागली. आता १ ऑक्टोबरपासून येत असलेल्या सततच्या पावसामुळे काहींनी कापणी करून ढीग लावले. त्यांचे ढीग ओलाव्याने खराब होत आहे. ज्यांना ढीग करणे शक्य झाले नाही, त्याचे सोयाबीन शेतात ओले होत आहे.
ठळक मुद्देशेतकरीबांधवांची मागणी : सर्वेक्षणाचा फार्स नको, सततच्या पावसामुळे सोयाबीनचे ढीग भिजलेत