लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतीच्या ओलीत कामासाठी सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत वीज पुरवठा देण्यात यावा, अशी मागणी भूमिपुत्र संघर्ष वाहिणीने केली आहे. याबाबत महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना सोमवारी निवेदन देण्यात आले.तरोडा फिडर अंतर्गत सोनेगाव (स्टेशन), आष्टा, जऊळगाव, भुगाव ही गावे आहेत. या चारही गावांमध्ये शेतीकरिता सोमवार ते गुरूवार रात्री ११.३० ते सकाळी ७.३० आणि शुक्रवार ते रविवार सकाळी ७.३० ते दुपारी ३.३० आठवड्यातून १६८ तासांपैकी केवळ ५६ तास वीजपुरवठा दिला जात आहे. शेतकºयांना रात्री ओलीत केल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. परिणामी, रात्रीचे ओलित करताना सरपटणारे प्राणी, हिंसक पशु यांचाही अनेकदा शेतकºयांना सामना करावा लागतो. यामुळे शेतीकरिता वीज पुरवठ्याची वेळ सकाळी ६ ते सायंकाळी ६ ठेवण्यात यावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे. जेणेकरून दिवसा शेतकºयांना पिकांना जगविता येईल. यामुळे शेतकºयांना सिंचनासाठी सकाळी वीज पुरवठा द्यावा, अशी मागणी भूमिपुत्र संघर्ष वाहिणीने केला आहे. दहा दिवसांत यावर तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी जिल्हा प्रमुख प्रशांत देशमुख, प्रवीण उगेमुगे, किशोर मुने, गजानन भालकर, किशोर धोपटे तथा शेतकरी उपस्थित होते.
शेती ओलितासाठी सकाळी वीजपुरवठा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 11:40 PM
शेतीच्या ओलीत कामासाठी सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत वीज पुरवठा देण्यात यावा, अशी मागणी भूमिपुत्र संघर्ष वाहिणीने केली आहे.
ठळक मुद्देभूमिपुत्र संघर्ष वाहिनीची मागणी : अधीक्षक अभियंत्यांना भेटले