लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले आहे.वादळ मेघ गर्जनेसह शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा सर्व्हे करून सरकारतर्फे आर्थिक मदत मिळण्यात यावी अशी मागणी माजी आमदार राजू तिमांडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसवेक सौरभ राजू तिमांडे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने केली आहे. हिंगणघाट येथील उपविभागीय अधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले.गत तीन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपीटीमुळे शेतकºयांच्या शेतातील उभी पिके नष्ट झाली आहे. त्यात भाजीपाला गहू, हरभरा, कांदा, संत्रा, आंबा, मोसंबी इत्यादी पिकाचा समावेश आहे. तसेच वादळामुळे घराचे छप्पर उडून नुकसान झाले आहे.वीज पडल्यामुळे अनेक जनावरे मृत पावली तरी सर्व पिकांचे व शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून आर्थिक मदत देण्यात यावी. सध्या ताहीर झालेली मदत अत्यंत तुटपुंजी असून शेतकऱ्यांना नुकसानीच्या आधारावर आर्थिक मदतीचा हात घ्यावा अशी मागणी करण्यात आली. निवेदन देताना रा.यु.काँ. पक्षाचे अध्यक्ष गौरव घडे, उपाध्यक्ष प्रशांत लोणकर, भारत मेश्राम, सुनील ठाकरे, हरिष काळे, शुभम थुटे, अमित कोपरकर, अमोल त्रीपाठी, रिषभ धनरेल आदी कार्यकर्ते उपस्थित होते.तेलंगणाच्या धर्तीवर शेतकऱ्यांना मोफत वीज व बियाणे द्यातेलंगाणा सरकारच्या धर्तीवर राज्यातील शेतकऱ्यांना बी-बियाणे, खत औषध व २४ तास मोफत वीज देण्यात यावी तसेच महाराष्ट्र सरकारने रोजगार हमीच्या कामात निंदन खुरपण, डवरणं, वखरण, नांगरने, ट्रॅक्टरने नांगरनी इत्यादी घटकांचा समावेश करून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात घ्यावा, तसेच शेतकऱ्यांसाठी आरक्षणही जाहीर करण्यात यावे, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडे माजी आमदार राजू तिमांडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 10:46 PM
जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आली आहे.
ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन : नुकसान पाहून मदतीची मागणी