लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील डॉ जाकीर हुसेन कॉलोनी सोसायटी बरीच जुनी आहे. येथील रहिवास्यांना प्रॉपर्टी कार्ड देणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणी येत आहे. यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश आ डॉ पंकज भोयर यांनी महसूल विभागाला दिले. शहरातील सर्व्हे क्रमांक ८१/२ मधील ६ एकर जागेवर १९६६ मध्ये डॉ जाकीर हुसेन कॉलोनी सोसायटी वसविण्यात आली.या जागेवर ३२ भूखंड पाडून त्याची विक्री करण्यात आली. येथील अनेक नागरिकांनी घराचे बांधकाम सुद्धा केले.सन २०१० पर्यन्त ७/१२ देण्यात येत होता पण अचानक बंद करण्यात आला यांनंतर काही नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड देण्यात आले पण जुलै २०१७ नंतर प्रॉपर्टी कार्ड देणे बंद करण्यात आले त्यामुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने त्यांनी आपली व्यथा आ डॉ पंकज भोयर यांना सांगितली. आ भोयर यांनी तातडीने महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली. बैठकीला उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार मनोहर चव्हाण, तालुका भूमिअभिलेख अधिकारी भाऊसाहेब पवार व महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. आ डॉ पंकज भोयर यांनी सबंधित अधिकाºयांकडून येत असलेल्या अडचणीची माहिती जाणून घेतली. भूमीअभिलेख कार्यालयात चुकीच्या नोंदी घेण्यात आल्यामुळे प्रॉपर्टी कॉर्ड देणे बंद करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले. प्रशासकीय नोंदीतील चुकीमुळे नागरिकांना त्रास होत आहे ही चूक तातडीने दुरुस्त करण्यात यावी, लवकर नागरिकांना प्रॉपटी कॉर्ड देण्यात यावे, असे निर्देश दिले. उपविभागीय अधिकारी दिघे यांनी याबाबत भूमी अधीक्षक यांच्याशी चर्चा करून प्रॉपर्टी कार्ड देण्यांत येईल असे सांगितले. यावेळी नगरसेवक कैलास राखडे, जी एम शेख, मो.अकिल शेख, अकरम शेख, लतीफ शेख, सादिक शेख, अ रहीम शेख, न्याजबाबू, नईम, इरफान शेख,रशीद शेख, असलम अन्सारी, निसार अहमद शेख, शेख कलाम, शकील शेख, मोहसीन शेख, फैयाज शेख, कैसर अन्सारी, मो उमेर, शेख नाझीम, मोहीजोद्दीन काझी, अताउला खान, शेख जब्बार, नययद काझी, समीर काझी, रिजवण काझी, रिजवाण खान, नदीम शेख, अवेज खान, आसिफ खान आदी उपस्थित होते.
नागरिकांना तातडीने प्रॉपर्टी कार्ड द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 10:34 PM
शहरातील डॉ जाकीर हुसेन कॉलोनी सोसायटी बरीच जुनी आहे. येथील रहिवास्यांना प्रॉपर्टी कार्ड देणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणी येत आहे. यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश आ डॉ पंकज भोयर यांनी महसूल विभागाला दिले.
ठळक मुद्देजाकीर हुसेन कॉलनी : पंकज भोयर यांचे महसूल विभागाला निर्देश