लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : वर्धा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात लोकनेता म्हणून इतिहासात नाव कोरलेले प्रमोददादा शेंडे हे सर्वसामान्यांचे नेतृत्व करणारे नेते होते. राजकारणाच्या माध्यमातून निस्पृह वृत्तीने जेव्हा लोकसेवा केली जाते, तेव्हाच मतदार लोकनेते पदाची माळ त्यांच्या गळ्यात घालतात, असे मत आ. अमर काळे यांनी व्यक्त केले.जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्यावतीने प्रमोद शेंडे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. नारायण निकम तर अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष रवी शेंडे, वर्धा एमआयडीसी असो. चे अध्यक्ष प्रवीण हिवरे, डॉ. बावनकर, प्रा. येसनकर, सुनीता शेंडे, पांडुरंग कापसे, प्राचार्य संध्या कापसे, काळे आदी उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विविध कला दालनांचे उद्घाटन करण्यात आले. हस्तलिखीताचे विमोचनही करण्यात आले. प्राचार्य कापसे यांनी अहवाल वाचन केले. गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मान्यवरांनी प्रमोद शेंडे यांच्या स्मृती विचार रूपाने जपून ठेवण्याचे आवाहन नव्या पिढीला केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांचा विविध कलागुणांचा रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशाकरिता शिक्षक व कर्मचाºयांनी सहकार्य केले.
राजकारणातून नि:स्पृह वृत्तीने लोकसेवा गरजेची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 12:22 AM
वर्धा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात लोकनेता म्हणून इतिहासात नाव कोरलेले प्रमोददादा शेंडे हे सर्वसामान्यांचे नेतृत्व करणारे नेते होते.
ठळक मुद्देअमर काळे : प्रमोद शेंडे पुण्यस्मरण कार्यक्रम