शेतकरी संघटनेची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून साकडे लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : नाफेडने १० वा ११ मे पासून तूर खरेदीला पुन्हा प्रारंभ करणे गरजेचे होते; पण ती १७ मे पासून सुरू करण्यात आली. खरेदीला आठ दिवस विलंब करण्यात आला. यामुळे तूर खरेदीची ३१ मे ऐवजी १४ जून करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली. याबाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना मंगळवारी निवेदन देण्यात आले. नाफेडने खरेदी केलेला माल नियमाप्रमाणे सायंकाळीच उचलावा लागतो; पण तो अद्याप तिथेच आहे. यामुळे नवीन माल ठेवण्यासाठी यार्ड रिकामे नाही. याबाबत संबंधितांना सूचना देणे गरजेचे आहे. हेक्टरी २५ पोते खरेदीचा नियम करण्यात आला; पण यंदा शेतकऱ्यांना एकरी ८ क्विंटल उत्पादन झाले. ही बाब विचारात घेत मर्यादा वाढवावी. नाफेडने ग्रेडर व काट्याची संख्या वाढवावी. यामुळे माल लवकर उचलला जाईल. शेतकऱ्यांचा माल यार्डात येताच आवक पावती देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली. निवेदन देताना सरोज काशीकर, पांडुरंग भालशंकर, सतीश दाणी, प्रभाकर झाडे, शैला देशपांडे, शांताराम भालेराव, धोडंबा गावंडे, सुनंदा तुपकर, अरविंद राऊत आदी उपस्थित होते.
तूर खरेदीची मुदत १४ जूनपर्यंत वाढविण्यात यावी
By admin | Published: May 24, 2017 12:56 AM