शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेब थोरातांच्या हाती राज्याचे अधिकार द्यायला हवे; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
2
IND vs SA 3rd T20: टीम इंडियाने पुन्हा केली तीच 'आयडिया'! तिलकने खेळ थांबवला अन् आफ्रिकेचा 'गेम' झाला!!
3
इस्रायलचा बेरूतमध्ये मोठा हवाई हल्ला, अनेक इमारतींचे नुकसान, सात मुलांसह २३ जणांचा मृत्यू
4
'शक्तिमान'साठी मुकेश खन्नांनी रणवीर सिंहला केला होता विरोध; म्हणाले, "तो दोन तास..."
5
घसरणीच्या सत्रांनंतर अखेर शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स-निफ्टी वधारला; मिडकॅप-स्मॉलकॅप मध्ये खरेदी
6
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
7
भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
8
...तर त्यांच्या कानाखाली फटाके वाजवा, भाषण करताना राज ठाकरे संतापले, कारण काय?
9
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
10
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
11
भाजपकडून माझा बुथ, सर्वात मजबूत अभियान, नरेंद्र मोदी साधणार महाराष्ट्रातील १ लाख बुथ प्रमुखांशी संवाद
12
विशेष लेख: न्या. चंद्रचूड मानवी हक्क आयोगाचे नवे अध्यक्ष?
13
कोण आहेत कॅनडातील सर्वात श्रीमंत भारतीय, ज्यांना जगही म्हणतं कॅनडियन वॉरन बफे; पद्मश्रीनंही झालाय सन्मान
14
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
15
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
16
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
17
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
18
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
19
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
20
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी

प्रचाराचे बॅनर लावले; पण घरमालकाची परवानगी घेतली का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2024 6:39 PM

Vardha : दर्शनी भागावर फलक लावण्यासाठी चढाओढ

लोकमत न्यूज नेटवर्क चिकणी (जामनी) : जसजशी विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जवळ येत आहे, तसतशा गावखेड्यात प्रचार यंत्रणा जोर धरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. निवडणूक कोणतीही असो, उमेदवारांचे बॅनर हा मुख्य घटक मानला जातो. विधानसभा निवडणुकीत आपले नशीब आजमावत असलेल्या उमेदवारांचे बॅनर मुख्य चौकातील घरांच्या दर्शनी भागात लावण्यासाठी गावातील कार्यकर्त्यांची चढाओढ सुरू आहे. 

उमेदवाराच्या प्रचाराचे बॅनर लावण्यासाठी घरमालकाची परवानगी घेणे अनिवार्य आहे. परंतु, काही कार्यकर्त्यांना याची माहितीसुद्धा नसते. विनापरवानगीच ते बॅनर लावून मोकळे होतात. आजघडीला गावातील धनाढ्य शेतकरी शहरांच्या ठिकाणी वास्तव्यास आहेत. तरीही त्यांच्या घराला उमेदवारांचे बॅनर लागलेले दिसून येतात. यामुळे ग्रामस्थांकडून आश्चर्य व्यक्त केले जाते. बॅनर लावताना कुणाची परवानगी घेतली? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. निवडणूक विभागाने ग्रामीण भागात फेरफटका मारला तर असे अनेक ठिकाणी विनापरवानगी कार्यकर्त्यांनी उमेदवारांचे बॅनर व फलक लावल्याचे उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही. विनापरवानगी बॅनर लावणे हे सुद्धा आचारसंहितेच्या उल्लंघनात येत असून तो उमेदवार कारवाईस पात्र ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

काहींनी ठेवले घरावर तुळशीपत्रकाहींनी घरावर तुळशीपत्र ठेवून विधानसभा निवडणूक डोक्यावर घेतलेली दिसत आहे. ते आधी गाव पारावर जाऊन आपल्या नेतेगिरीचा तोरा मिरवतात. सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावातील सार्वजनिक ठिकाणी, पानटपरी, गावठाण असो अथवा गावपाराच्या ठिकाणी निवडूक विषयावर चर्चा रंगलेल्या दिसून येत आहेत. यात अनेकांचा सहभाग असून, वेळ घालवत बराच विचार- विमर्श करत असल्याचे चित्र सध्या तालुक्यात दिसून येत आहे. काही गावनेत्यांना तर झोपेचेही भान राहिलेले नाही.

नैसर्गिक थंडीवर राजकीय तापमान भारीनोव्हेंबर महिना म्हटला की थंडीचा जोर वाढतो. मात्र, यंदा थंडीचा जोर ओसरला असून, निवडणुकीचा जोर ग्रामीण भागात जोमात बघायला मिळत आहे. या निवड- णुकीत काँग्रेस, भाजप, बसपा, वंचित सोबतच अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात असून, कोण बाजी मारणार? यावर ग्रामीण भागातील चौकाचौकांत चर्चा रंगत आहे. यामुळे नैसर्गिक थंडीवर राजकीय तापमान भारी पडत असल्याचे दिसून येत आहे.

पांढऱ्या पोशाखाची मागणी वाढली नुकतीच विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असल्याने गावागावात राजकीय चर्चेचा विषय गाव पारावर रंगलेला दिसून येतो. एवढेच नाही तर गावागावातील तथाकथित राजकीय गावनेता हा शुभ्र पांढऱ्या रंगाचे कपडे घालून मिरवताना दिसत आहे. यामुळे पांढऱ्या पोशाखाची मागणी वाढली आहेत.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४wardha-acवर्धा