शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
4
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
5
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
6
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
7
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
8
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
9
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
10
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
11
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
12
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
13
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
14
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
15
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
16
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
17
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
18
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
19
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
20
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स

१२ वर्षांपासून प्रलंबित जमिनीचा प्रश्न मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 10:32 PM

नेरीच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जिद्द, चिकाटी व प्रशासनाच्या कार्यकुशलतेमुळे आणि शासनावर ठेवलेला विश्वास तसेच इच्छाशक्तीमुळे आज १२ वर्षापासून प्रलंबित असलेला जमिनीच प्रश्न मार्गी लागला आहे.

ठळक मुद्देपंकज भोयर : अकरा शेतकऱ्यांना पर्यायी जमिनीचे आदेश वितरित

आॅनलाईन लोकमतवर्धा : नेरीच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जिद्द, चिकाटी व प्रशासनाच्या कार्यकुशलतेमुळे आणि शासनावर ठेवलेला विश्वास तसेच इच्छाशक्तीमुळे आज १२ वर्षापासून प्रलंबित असलेला जमिनीच प्रश्न मार्गी लागला आहे. शिवाय त्यांना हक्काची जमीन मिळाली आहे, असे प्रतिपादन आ. डॉ. पंकज भोयर यांनी नेरी येथील प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनीचे वाटप कार्यक्रमात केले.व्यासपीठावर जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा पुनर्वसन अधिकारी राजलक्ष्मी शाह, पं. स. सदस्य सविता मुते, सरपंच धनराज टुले यांची उपस्थिती होती. आ. भोयर पुढे म्हणाले, आर्वी तालुक्यातील मौजा नेरी, अंतरडोह, वाढोणा (ठा.) येथील प्रकल्पग्रस्तांची जमीन १२ वर्षांपूर्वी निम्न वर्धा प्रकल्पाचे बुडीत क्षेत्रासाठी संपादीत करण्यात आली होती. जमिनी व घरे बुडीतक्षेत्रात गेल्यामुळे त्यांचे शासनाच्यावतीने नेरी (पुनर्वसन) सालोड येथे भूखंड देऊन पूनर्वसन करण्यात आले;पण त्यांची जमीन बुडित क्षेत्रात गेल्यामुळे पर्यायी जमीन मिळण्यासाठी शासनाकडे नेरीचे सरपंच यांनी पाठपुरावा केला. तसेच आमदार म्हणून आपण स्वत: महसूलमंत्र्यांकडे सदर प्रश्न लावून धरला. त्याला शासनाने मंजुरी देवून ११ शेतकºयांना पर्यायी जमिनी उपलब्ध करून दिल्या आहे. यासाठी पुनर्वसन विभाग व नेरी येथील प्रकल्पग्रस्तांनी मोठी कामगीरी केली आहे. उर्वरित शेतकºयांना लवकरच जमिनीचे वाटप करण्यात येणार असल्याचे यावेळी आ. भोयर यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुनर्वसन अधिकारी राजलक्ष्मी शाह यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात रामभाऊ जाधव, भीमराव काळबांडे, विनोद टोकशे, मारोती झलके, प्रवीण टोकश, बाबाराव टोकशे, प्रभाकर निस्ताने, गंगाधर सेलोकार, रंगाराव सेलोकार, विठ्ठल डेहणकर यांना पर्यायी जमिनीचे आदेश वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन राखी जयस्वाल यांनी केले.