लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : खुल्या बाजारात कापूस, तूर, चणा व सोयाबीनचे भाव शासनाच्या हमीभावापेक्षा कमी झालेत. शासनाने हा शेतमाल हमीभावाने खरेदी करावा म्हणून शासकीय खरेदी केंद्रे सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. या मागणीच्या पूर्ततेचा देखावा करीत शासनाने काही ठिकाणी तूर खरेदी सुरू केली, पण या केंद्रावर एकरी केवळ २ क्विंटल ६० किलो एवढीच तूर स्वीकारली जाते. ही बाब अत्यंत अन्यायकारक असून शेतात पिकलेली सर्वच तूर शासनाने खरेदी करावी, अशी मागणी रोहणा परिसरातील शेतकरी करीत आहेत.कापूस हे पीक खर्चाला व मानवी श्रमाला न परवडणारे पीक असून आधी कापसाच्या पिकात मिश्रपीक म्हणून तुरीचे पीक घेणारा शेतकरी आता संपूर्ण शेतात तुरीचे एकमेव पीक घ्यायला लागला आहे. परिणामी, अनेक शेतकऱ्यांना एकरी पाच-सहा क्विंटल तुरीचे उत्पादन होते. जर शेतात कापसामध्ये मिश्र पीक म्हणून तुरीचे उत्पादन घेतले तरी साधारण चार एकर शेतात कमीत कमी चार ते पाच क्विंटल तुरी पिकतात. शेतात तुरीचे एकमेव पीक असेल तर तलाठी धुरा व काही जागा कमी करून शेतातील तुरीचा पेरा सात बारावर नोंदवून देतो. पण कापसामध्ये मिश्रपीक म्हणून तुरी असली तर तलाठी केवळ २० ते २५ टक्के आराजी तुरीचे असल्याची नोंद करतो. अशावेळी शासनाच्या धोरणानुसार एकमेव तुरीचेच पीक असेल तर त्या शेतकºयांच्या शासकीय केंद्रावर १० क्विंटल ४० किलो एवढ्याच स्वीकारल्या जातात. तर चार एकरात कापसासोबत मिश्र पीक म्हणून तुरी लावल्या असतील तर अशा शेतकºयांच्या केवळ २ क्विंटल ६० किलो तुरी शासन स्वीकारते. यामुळे काही तुरी शासकीय खरेदी केंद्रावर नेल्यावरही उरलेल्या तुरी शेतकºयांनी कुठे विकाव्यात, हा प्रश्न उभा राहतो. या परिस्थितीमुळे व्यापाºयांचे फावत असून व्यापारी शेतकºयांना हमीभावापेक्षा ६०० ते ७०० रुपयाचे क्विंटलमागे लुटत आहे. अधिक चौकशी केली असता शासकीय खरेदी केंद्रावरील अधिकारी यंदा दुष्काळ आहे, मग शेतकऱ्यांजवळ एवढ्या तुरी कशा आल्यात असा प्रश्न करतात. केंद्रावर येणाऱ्या तुरी ह्या सिंचनाची सोय असणाऱ्या शेतकऱ्यांच्याच आहे ओलिताची सोय असणाऱ्या शेतकऱ्यांना एकरी पाच क्विंटल व कापसात मिश्र पीक घेणाऱ्यांना चार एकरात १० क्विंटलपर्यंत तुरीचे उत्पादन झाले, ही परिस्थिती आहे. शासनाने मागील वर्षीप्रमाणे यंदाही एकरी पाच क्विंटल या प्रमाणात तुरी खरेदी कराव्यात, अशी मागणी रोहणा परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
तूर खरेदीचे प्रमाण अल्प असल्याने शेतकऱ्यांसमोर प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2019 11:52 PM
खुल्या बाजारात कापूस, तूर, चणा व सोयाबीनचे भाव शासनाच्या हमीभावापेक्षा कमी झालेत. शासनाने हा शेतमाल हमीभावाने खरेदी करावा म्हणून शासकीय खरेदी केंद्रे सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. या मागणीच्या पूर्ततेचा देखावा करीत शासनाने काही ठिकाणी तूर खरेदी सुरू केली, पण या केंद्रावर एकरी केवळ २ क्विंटल ६० किलो एवढीच तूर स्वीकारली जाते.
ठळक मुद्देव्यापाऱ्यांकडून लूट : गतवर्षीप्रमाणेच खरेदी करण्याची मागणी