वर्धा : शाळा-कॉलेजजवळ तसेच सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे कोटपा कायद्यानुसार गुन्हा आहे. त्याचे उल्लंघन केल्यास यापुढे पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे संकेत पोलीस प्रशासनाने दिले. त्यासाठी कोटपा कायद्याचे खास प्रशिक्षण पोलिसांना देण्यात आले.बुधवारी शहरातील शाळा-महाविद्यालय परिसरात सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाºया पानटपऱ्यांवर कारवाई करण्यात आली. या कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी म्हणून वर्धा पोलिसांनी कोटपाची मोहीम हाती घेतली आहे.सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीबाबत प्रशिक्षण कार्यशाळा पोलीस मुख्यालयात जिल्हा अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच अपर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक नीलेश ब्राह्मणे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली.यावेळी संबंध हेल्थ फाऊंडेशनचे महाराष्ट्र प्रकल्प व्यवस्थापक देविदास शिंदे यांनी कोटपा कायदा, त्यातील विविध कलमे, पोलीस कारवाईची पद्धत याबाबत सविस्तर मार्गदर्शन करीत कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीबाबतचे प्रशिक्षण पोलिसांना दिले. केअरिंग फ्रेंड्सचे निमेश सुमती, एनटीसीपी कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉ. नम्रता सलुजा यांनी तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे भारतात आजपर्यंत मृत्युमुखी पडलेले लोक याविषयी आकडेवारी मांडली. मार्गदर्शन केले.यावेळी उपस्थित पोलिसांची एनटीसीपीअंतर्गत दंत चिकित्सक चोपकर आणि त्यांच्या पथकाने मौखिक आरोग्य तपासणी करून मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत १२ पोलीस अधिकाºयांसह ४८ पोलीस उपस्थित होते. प्रशिक्षणानंतर प्रत्येक पोलीस ठाण्यात कोटपा कायद्याअंतर्गत कारवाई मोहीम राबविली जाणार आहे.शाळा-कॉलेजजवळ पान टपऱ्यांवर कारवाईकोटपा कायद्याचे खास प्रशिक्षण दिल्यानंतर वर्धा पोलिसांनी चोवीस तासांतच शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, रेल्वेस्थानक, बसस्थानक परिसरात अवैध तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारे, कोटपा कायद्यानुसार लहान मुलांसाठी सूचना फलक न लावणाऱ्या, शैक्षणिक संस्थांच्या १०० यार्ड परिसरात तंबाखू विकणाºयांवर कारवाई केली. यामुळे शहरातील पानटपºया चालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. शहर पोलिसांनी कारवाई केली.
पोलीसदादांना कोटपा कायद्याचे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 11:38 PM
शाळा-कॉलेजजवळ तसेच सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे कोटपा कायद्यानुसार गुन्हा आहे. त्याचे उल्लंघन केल्यास यापुढे पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे संकेत पोलीस प्रशासनाने दिले. त्यासाठी कोटपा कायद्याचे खास प्रशिक्षण पोलिसांना देण्यात आले.
ठळक मुद्देशाळा-महाविद्यालयाजवळ तंबाखू-सिगारेट विकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई