शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

राधिका अन् सिमरन जिल्ह्यातून प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 11:49 PM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या परीक्षेत जिल्ह्यातील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांपेक्षा वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरीच केली आहे.

ठळक मुद्देगो.से. वाणिज्यचे विद्यार्थी चमकले : दोघींनी मिळविले ९६.४७ टक्के गुण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या परीक्षेत जिल्ह्यातील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांपेक्षा वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरीच केली आहे. वर्धा शहरातील गो.से. वाणिज्य महाविद्यालयाच्या राधिका तापडिया व सिमरन थदानी यांनी समान टक्के गुण संपादीत करून जिल्ह्यातून प्रथम आल्या आहेत. त्यांनी ९६.४७ टक्के गुण संपादीत केले आहे. तर गो. से. वाणिज्य महाविद्यालयातीलच अभिषेक झोडे यांने ९५.६९ टक्के तर चित्रिका गेलानी हिने ९५.५४ टक्के गुण संपादित करून अनुक्रमे जिल्ह्यातून द्वितीय व तृतीय स्थानी राहिले.यंदाच्या वर्षी वर्धा जिल्ह्यातील विज्ञान शाखेच्या विविध कनिष्ठ महाविद्यालयातील एकूण ६ हजार ६४० विद्यार्थ्यांनी प्रथमच परीक्षेचे अर्ज भरले होते. शिवाय ६ हजार ६३६ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यापैकी ५ हजार ९११ विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली. त्याची टक्केवारी ८९.०७ इतकी आहे. तर कला शाखेच्या विविध कनिष्ठ महाविद्यालयातील एकूण ६ हजार ९३७ विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज भरले होते. तसेच ६ हजार ९२९ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यापैकी ४ हजार ८५० विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली. त्याची टक्केवारी ७० इतकी आहे. वाणिज्य शाखेच्या विविध कनिष्ठ महाविद्यालयातील एकूण २ हजार २३६ विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज भरले होते. शिवाय २ हजार २३५ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली.त्यापैकी १ हजार ९८० विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली. त्याची टक्केवारी ८८.५९ इतकी आहे. एमसीव्हीसी शाखेच्या विविध कनिष्ठ महाविद्यालयातील एकूण १ हजार २३३ विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज भरले होते. त्यापैकी १ हजार २३२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ९७४ विद्यार्थ्यांनी परीक्षेत घवघवीत यश संपादीत केले आहे. त्याची टक्केवारी ७९.०६ इतकी आहे.सात कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्केवर्धा जिल्ह्यातील सात कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात वर्धा येथील सुशिल हिंमतसिंगका ज्यु. कॉलेज, सरस्वती विद्या मंदिर ज्यु. कॉलेज, देवळी तालुक्यातील पुलगाव नजीकच्या हिवरा येथील इंडियन मिलिटरी स्कूल, सेलू तालुक्यातील सिंदी (रेल्वे) येथील विद्याविकास ज्यु. कॉलेज, सेलू येथील दीपचंद चौधरी सायन्स ज्यु. कॉलेज, समुद्रपूर तालुक्यातील वासी येथील जे.डी. चौधरी कनिष्ठ महाविद्यालय, संस्कार ज्ञानपीठ समुद्रपूर यांचा समावेश आहे.राधिकाला व्हायचंय सीएबारावीच्या परीक्षेत ९६.४७ टक्के गुण संपादित करणाऱ्या साधिका तापडिया हिला उत्कृष्ट सीए व्हायचे आहे. ती दररोज खूप अभ्यास करीत नव्हती. मात्र, ती दररोज दोन तास अभ्यास करायची. शिवाय शाळा आणि शिकवणीला ती नियमित उपस्थिती दर्शवित होती. राधिका हिचे वडिल प्रशांत हे व्यावसायिक तर आई स्मीता या गृहिणी आहेत. उल्लेखनीय म्हणजे राधिका ही संयुक्त कुटुंबात राहत असून तिच्या कुटुंबात आजी-आजोबा, काका-काकूंसह एकूण १२ सदस्य आहेत. बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करणाºया राधिका हिला चित्र रेखाटण्याचा छंद आहे. इतकेच नव्हे तर शाळेला सुट्ट्या लागल्यानंतर दोन महिन्यांच्या कालावधीत नियमित चित्रकलेची शिकवणी लावते. तिने घेतलेल्या चित्रकलेल्या प्रशिक्षणामुळे ती सध्या उत्कृष्ट चित्रकारही झाली असल्याचे सांगण्यात आले.विज्ञान शाखेतून ‘रोशनी’ चमकलीवर्धा जिल्ह्यातील विज्ञान, कला व वाणिज्य तसेच एमसीव्हीसी शाखेच्या एकूण महाविद्यालयांपैकी केवळ सात कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. असे असले तरी विज्ञान शाखेचा विचार केल्यास वर्धा शहरातील जे.बी. विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या रोशनी मिश्रा हिने ९५.४४ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. तर न्यू इंग्लिशच्या प्रणाली पखाले ९४.०० टक्के आणि सुमित तिवरे ९२.६२ टक्के गुण घेऊन अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थानी राहिले.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकाल