राहुल गांधी आश्रमातच करणार भोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 11:52 PM2018-09-29T23:52:11+5:302018-09-29T23:52:49+5:30
कॉँग्रेसच्या अखिल भारतीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी येत आहेत. २ आॅक्टोबरला ते सेवाग्राम येथे नई तालिम येथील रसोड्यामध्ये जेवण करणार आहेत. त्यासाठी तयारी करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : कॉँग्रेसच्या अखिल भारतीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी येत आहेत. २ आॅक्टोबरला ते सेवाग्राम येथे नई तालिम येथील रसोड्यामध्ये जेवण करणार आहेत. त्यासाठी तयारी करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहे.
खासदार राहुल गांधी, खासदार सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह यांच्यासह कॉँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे किमान शंभर पदाधिकारी सेवाग्राम आश्रमात २ आॅक्टोबरला सकाळी ११ वाजता भेट देणार आहेत. त्यावेळी ते आश्रमातील सर्वधर्म प्रार्थनेत सहभागी होईल. सूत कताई करून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण करणार आहेत. तसेच माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांनी लावलेल्या महादेवभाई देसाई यांच्या कुटीसमोर बेलाच्या झाडाशेजारी राहुल गांधी चंदनाचे रोपटे लावणार आहेत. दुपारी १२ वाजेपर्यंत ते आश्रमात थांबण्याची शक्यता आहे.
नई तालिम समिती परिसरातील रसोड्यात कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानंतर ते राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला महादेव भवनाकडे रवाना होणार आहेत. ही बैठक संपल्यानंतर वर्ध्याकडे ते रवाना होतील, अशी माहिती आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनाच्या दृष्टीने प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार रणजीत कांबळे व पोलीस अधिकाºयांसह दिल्ली येथील विशेष एसपीजी पथकाने आश्रम परिसराची शनिवारी पाहणी केली. शिवाय सुरक्षेचा आढावाही घेतला.